पुणे येथे आठवे डॉक्टर्स कॉन्फरन्सचे आयोजन

2014-12-29_095737
पुणे (प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येणारे बंजारा डॉक्टर कॉन्फरन्स यावेळेस पुणे येथे आठवे बंजारा डॉक्टर कॉन्फरन्स दि. 17 व 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित करण्यात येत आहे. भारतातील सर्व बंजारा डॉक्टरांनी एकत्र यावे त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी. आपल्या समाजाबद्दलचे कर्तव्य काय आहे याची त्यांना जाणीव व्हावी व समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी ठोस पाऊले उचलावे हा या डॉक्टर असोसीएशन्सचा प्रमुख उद्देश आहे. तसेच बंजारा समाजील डॉक्टर होत असलेले तरूण-तरूणी याणी एकत्र यावे समाज काय आहे. याची ओळख व्हावी वसमाजाबद्दलचे त्यांचे गैर समज दुर व्हावे व आपल्या भावी जिवनासाठी आपल्याच समाजातून निवडण्याची त्यांना संधी मिळावी हा ह्या कॉन्फरन्सचा प्रमुख उद्देश आहे. कॉन्फरन्सचा तिसरा उद्देश म्हणजे समाजाची संस्कृती, वेशभुषा व समाजातील चांगल्या रूढी परंपरेचे जतन करणे व त्यासाठी कॉन्फरन्समध्ये लेंगी, बंजारा नृत्य, बंजारा वेशभूषेचे प्रदर्शन तसेच बंजारा साहित्यावरील पुस्तकाचे प्रदर्शन या गोष्टीचे आयोजन केलेले असते. तसेच समाजातील विशेष कार्य करीत असलेल्या व्यक्तीचे व आपल्या बुध्दीवर व आपल्या हिमतीवर उच्च पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीचे मान सन्मान देऊन त्यांचा सत्कार करणे हा या संघटनेचा उद्देश असतो. वरील सर्व गोष्टीसाठी डॉक्टरांचे असोसीएशन असावे ही बर्याच डॉक्टरांची ईच्छा होती. त्या इच्छेनुसार डॉ.टी.सी. राठोड सर यांनी पुढाकार घेऊन पहीले डॉक्टर कॉन्फरन्स 2007 ला यवतमाळ येथे घेतले व चांगल्या प्रकारे पार पडले त्यानंतर ठाणे, नांदेड, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, औरंगाबाद येथे हे कॉन्फरन्स पार पडले. आता हे आठवे कॉन्फरन्स पुणे येथे संपन्न होणार आहे. तरी या कॉन्फरन्ससाठी जास्तीत जास्त डॉक्टर व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा व आनंद लुटावा कॉन्फरन्स विषयी डॉक्टरांचे जे काही गैरसमज असतील किंवा आपले काही विचार असतील तर ते कॉन्फरन्समध्ये जरूर मांडावे जेने करून असोसिएशन मधील त्रुटी कमी होतील व असोसिएशन स्ट्रॉग बनेल. असे आयोजक समितीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. संपर्क डॉ.संयोगीता नाईक, पुणे मो. 9822070692, डॉ.विजय पवार, पुणे मो. 9422210434, डॉ.भाऊसाहेब नाईक- 9096282804, डॉ.साहेबराव राठोड- 9822529309, डॉ.माधुरी राठोड-8605639922, डॉ.कल्पना पवार- 9421844350, डॉ.सचिन राठोड- 9423254027, डॉ.सुरेश नाईक- 9860274866.

श्रोत : बंजारा पुकार