पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रयत्नांने पोहरागड व धामणगांव देव विकास आराखडयातील विकासकामाना निधी मंजुर

प्रेस नोट
प्रति,
मा.संपादक,
सामना/ लोकमत / सकाळ / लोकसत्ता / देशोन्नती / महाराष्ट्र टाईम्स / पुण्यनगरी / नवभारत/
तरूणभारत /नवाकाळ /पुढारी/ महासागर/(मुंबई,नागपुर,यवतमाळ,अकोला,वाशिम,बुलडाणा)

विषय : *पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रयत्नांने पोहरागड व धामणगांव देव विकास आराखडयातील विकासकामाना निधी मंजुर*
( सदर बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द करावी. )

मुंबई दि.22 नोव्हेबर,2017 : गोर बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पोहरागड येथे जागतिक स्वरूपाचे तिर्थक्षेत्र व्हावे व ते जगभरातील समस्त गोर बंजारा व इतर ( गोर व कोर ) यांचे श्रध्दास्थान व्हावे, अशी तिव्र तळमळ राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.श्री.संजय राठोड यांची होती. त्यांच्या धडपडीला ग्रामविकास विभागाने रू.2499.80 कोटी च्या विकास आराखडयाला सोबतच धामणगांव देव तिर्थक्षेत्राला रू.19 कोटीची प्रशासकीय मंजूरी दिली.
याबाबत सविस्तर असे की, गोर बंजारा समाजाचे एकमेव श्रध्दास्थान व सतगरू म्हणून संत श्री सेवालाल महाराज यांच्याकडे पाहिल्या जाते. त्यांची समाधी तिर्थक्षेत्र पोहरादेवी, ता.मानोरा, जि.वाशिम येथे असून गेली 300 वर्षापासून या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. किंबहूना भक्तांची गैरसोय होत होती. परंतू सतगरू सेवालाल यांनी त्यांच्या एका बचनात म्हटले होते. “ मार पालेर खुटा मार मज ठोक लियू ” अर्थात माझ्या आश्रमाची डागडूजी करण्यासाठी कोणी तरी माझाच माणूस येईल. याची प्रचिती म्हणून की काय गेल्या 300 वर्षानंतर पहिल्यादाच शासकीय पातळीवरून ना.श्री.संजय राठोड यांनी प्रयत्न करून मोठा भरीव निधी निव्वळ मिळवून दिलाच नाही तर या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्र्यांना पोहरादेवीचे दर्शनही घडविले. सदर आराखडयास मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 09 डिसेंबर,2016 रोजी विधानभवन, नागपूर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ऊक्त बैठकीत विकास आराखडा सादर करण्याचे सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी वाशिम यांनी तिर्थक्षेत्राचा एकूण रू.25 कोटी किंमतीचा विकास आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला. सदर आराखडयास जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती व मा.पालकमंत्री वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली. या आराखडयामध्ये 1) भक्त निवासाचे बांधकाम – रू.255.38 लक्ष , 2) संरक्षण भिंतीचे बांधकाम – रू.100.02 लक्ष, 3) प्रदर्शन केंद्र रू.1464.42 लक्ष , 4 ) अंतर्गत रस्ते रू.96.49 5) सभामंडप – रू.240.02 लक्ष , 6) जमिनीचे सपाटीकरण व बगीचा – 346.50 लक्ष इतक्या एकूण 25 कोटी किंमतीचा विकास आराखडा प्रस्तावित केला त्यास मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि.07 जुलै,2017 रोजी उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली,दिनांक 28 ऑगस्ट,2017 रोजी मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने रू.2499.80 कोटीच्या विकास आराखडयास मान्यता देऊन आजअखेर ग्रामविकास विभागाने त्यास प्रशासकीय मंजूरी दिली. यासोबतच श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज समाधीस्थळ, धामणगांव देव , ता.दारव्हा, जि.यवतमाळ या तिर्थक्षेत्राचा विकास आराखडयास निधी मंजूर करण्यात आला. मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 08 फेब्रुवारी,2016 रोजी झालेल्या बैठकीमध्ये एकूण 90 कोटी इतक्या रकमेचा विकास आराखडा जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सादर केला होता. त्यास प्रथम टप्यात 6 कोटी इतका निधी तातडीच्या कामासाठी वितरीत करण्यात आला. त्यानंतर नियोजन विभागाच्या दि. 4 जून, 2015 च्‍या शासन निर्णयान्वये रू.25 कोटीच्या मर्यादेत उर्वरित रू.19.47 कोटी इतक्या रकमेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यवतमाळ व पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली. सदर आराखडयामध्ये दर्शनबारी , प्रसाधनगृह , सभागृह , भोजनकक्ष, बालउद्यान, पोचमार्ग , ग्रामीणमार्ग , पाणीपुरवठा , विद्युत पुरवठा ई. कामांसाठी रू.19 कोटी चा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. त्यानुसार दि.07 जुलै, 2017 रोजीच्या मुख्य सचिवांच्या बैठकीत मान्यता दिली. सदर तिर्थक्षेत्राला ब वर्ग देण्यात आला असून दि.28 ऑगस्ट, 2017 रोजी रू.19.47 कोटी इतक्या किंमतीचा श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज समाधीस्थळ, धामणगांव देव , ता.दारव्हा, जि.यवतमाळ या तिर्थक्षेत्रास मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली या बैठकीच्या ईतिव्रुत्तासह आज दि. 22 नोव्हेबर,2017 ग्रामविकास विभागाने रू.2499.80 कोटी च्या विकास आराखडयाला सोबतच धामणगांव देव तिर्थक्षेत्राला रू.19 कोटीची प्रशासकीय मंजूरी दिली.याबद्दल सर्व स्तरातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

*(निलेश राठोड)*
*मा.राज्यमंत्री(महसूल)यांचे स्वीय सहायक*
*(9892333233)*