“पाढवा व बलीपतीप्रदा”

[7:06am, 10/24/2014] वसंत
जाधव:  पाडवा अर्थात् बलिप्रतिपदा
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
        🌞 २४:१०:२०१४🌞
              नव वर्ष   
     दुकान उघडण्याचा मुहुर्त
सकाळी -०८:३३ ते ०९:३०
           -१०:२८  ते ११:१०
    पाडवा आगमनाने आपल्या 
आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावरचा विजय
नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो
        थोर मोठ्याचे आशिर्वाद
आपल्याला मीळत राहो ….!
[7:06am, 10/24/2014] वसंत
जाधव: 🐄🐐 गोधन पुजा 🐄🐐            ““““““““““““““““““
    🐄🐐   🌿🐄🐐 °°°°°°°°°°°^^^^^^^^°°°°°°°°°°
सूरयोदय होताच तांड्यातील मुली
एकत्र येतात. हा दिवस गोधन पुज-
नाचा असतो. सर्वजनी फुल व इतर
पुजेची साधने आणण्यासा
ठी शेतात
जातात, बरू,लांबडी,कासाडी आन
-तात . तेंव्हा स्वताला उद्देशुन गीत
म्हणतात …….!
-“काली काबरी केरी छोय छोरीयो
   दवाळी पंचमीरी भणेये हम” …!!
-आम्ही लग्न झाल्यावर वेगवेगळ्या
गावाला जाऊ, पुन्हा भेट म्हणजे
दिवाळी किंवा पंचमीलाच होईल
असे वरील कडव्यातून व्यक्त होते
….गोधन पुजा म्हणजे श्रीकृष्णा चे
गुणगान ……जसे –
..”बाई देव किसना ये गोकुळेम
   जन्मोच ।
.. बाई देव किसना ये फुल लियेन
   बलारोच”॥
-अतिशय गोड आवाजात कृष्णाचे
  गुणगान……!
..”रिमझिम बासरी वजायो किसना
   ऊडे खोळाम बोले तोर ” ।
.. “फेरा लेरी लांबडी, झोका खारो
    बरूवा ” ॥
..”झोका खारो बरूवा, पडकेम ..”
-गोधन पुजनाचे साहित्य तोडून
घेतल्यावर सर्वजनी झाडाखाली
गार सावलीत फराळ करताना
हसने, खिदळणेम व गाणे चालुच
असते तेंव्हा……
..”हालडूल करये, पिपळेरो झाड छ
   वोरे हेट वीरेळां सुतोचय “।….
..उठ रे वीरा हात मुंडो धोल,
  मुठ्ठी को चुरमो खालरं वीरा॥

घरी आल्यावर प्रत्येक गोठ्यातील
गोबर जमा करून विशीष्ट आकार
देवून सुंदर आकृति तयार करून
गोधनाची पुजा केली जाते …
आणलेली फुले त्यात रोवली जाते
हे करत असताना गीत गातात …
-“वावड़िया काजबो शोभरे भूरीया
   गोधनेम खलरो फुल”…॥
-“लेरा लेरी लांबडी, झोका
    खारो बरूवा “… ॥
-“झोका खारोये बरूवा गोदनेम”

आशा प्रकारे अनेक गीत गात
गोधनाची पुजा करताना काश्याच्या
ताटात साखर टाकुन गव्हाचे पीठ
भाजून घेतात ( कुलर ) त्याला
प्रसाद म्हणतात .

गोधनाच्या वेळी गायवाड्यात 
देवाकडे आशिर्वाद मागणारे
सुंदर गीत गायले जात
-” फुल रे फुल, गाय गोदा फुल ।
केवड्या, मेवड्या ,बांड्या ,बुच्चा
धोळी कटारे, लांबी हारे ,
धोळो धन , गायीरो थाट
कुडा भरो घी, टोकळीस मातेर
छादळास कानेर, रिडी मुग-यान
गणगण देस ….!
दवाळी माऊली , गोधनेर पग
रूचा करेस “..॥ 
* यातून प्रत्येक जनावरांची संख्या
वाढत जावी , आशा प्रकारे देवापुढे
आशिर्वाद मागतात ।

    शेळीच्या धनाला उदेश्यून देखिल
सुरेख गीत म्हणतात …..
“हार बोकडो , तीर बोकडो
  हार हार करतू मुंडो सुखावे ..
  तिर तिर करतू पग थकावे”..॥
अलमुंगरी दलमुंगरी, दलेर बीजा
कबूतरी ….!
पान झडगे पबोया, छळी चरावे
धनगरीया…!
                     मँ मँ मँ मँ मँ
सर्वच मुली शेळीसारख्या ओरड-
तात, लाजतात, हसतात खेळीमेळी
वातावरणात पुजा पूर्ण करतात .

उरलेली रानफुल पायाखाली येवू
नये म्हणून गाणे गात नदीत टाकतात
व रात्री नायकाच्या घरी उपवास
सोडतात ।
   मध्यरात्री पर्यत नाचगाने संपत
जाणाऱ्या दिवाळीला अलविदा
करून झोपेच्या आधिन होतात….

सूर्योदया बरोबर पुन्हा तेच जिणं
…तिच दगदग ….?
चेहऱ्यावर तेच उसने हसू ….!!”
               गोर कैलास डी. राठोड..
               

Leave a Reply