पाकिस्तान मधील सामान्य माणूस अतिरेकी नांहीत.ते तर आपल्या सारखे सामान्य जीवन

पाकिस्तान मधील सामान्य माणूस अतिरेकी नांहीत.ते तर आपल्या सारखे सामान्य जीवन जगणारे लोक आहेत .भारतातून आलेल्या पाहुण्या कडून तेथील दुकानदार पैसे घेत नाहीत.कारण त्यांच्या मते भारतातून आलेले लोक आमचे पाहुणे आहेत.तेथील जनतेपैकी  केवळ मुठभर लोक अतिरेकी व धम॔ वेडे आहेत.   त्यात तेथील सेना व राजकारणी हे प्रमुख आहेत.तेथील सामान्य जनतेकडून भारतीयांचे किती सन्मानाने स्वागत होते याची अनेक उदाहरणे कुलदीप नय्यर सारख्या मोठ्या पत्रकारानी वारंवार लिहिले आहे .शिवाय पाकिस्तानात आपले गोरबंजारा सुद्धा राहतात.आणि बंजारा समाज कधीच अतिरेकी राहू शकत नाही .त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान ला अतिरेकी देश म्हणने हे तेथील सामान्य जनतेवर अन्याय करणारे आहे .शिवाय पाकिस्तानात असमा जहांगीर सारख्या आंतरराषट्रीय पातळीवर प्रचंड कार्य करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्ती राहतात.कालचे पेशावर मधील घटनेत आपल्या मुलासाठी रडणारे आपल्या सारखेच सामान्य लोक होते याचा विचार करा त्यांना ही आपण अतिरेकी म्हणणार आहोत काय?.
अमर राठोड.

Leave a Reply