पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या संदर्भात पी.बिदु नाईक यांनी शिष्टमंडळासह घेतली एकनाथ खडसेची भेट

नांदेड (प्रतिनिधी) – दि.22-11-2014 रोजी नांदेड विश्राम गृहामध्ये नांदेड दौर्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे महसुल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची शिष्ट मंडळासह भेट घेऊन पी. बिंदु नाईक यांनी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यास आलेल्या एका निवेदनाच्या संदर्भात शिफारस करण्याची केली मागणी. दिनांक 17-10-2014 रोजी पी. बिदु नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका निवेदनाद्वारे भटक्या विमुक्त राष्ट्रीय आयोगाची पुन्हा स्थापना करण्याची मागणीचा निवेदन पाठविला आहे. इ.स. 2000 ते 2004 च्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टी, एन.डी.ए.चे सरकार असतांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वा खालील सरकारने भटक्या विमुक्त राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. ह्या आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती बी. मोतीलाल नाईक (आंध्रप्रदेश) हे होते.

या काळात महाराष्ट्रातुन विमुक्त भटक्या, ओ.बी.सी. आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे खंबीर नेतृत्व करणारे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब (महाराष्ट्र उपमुख्यमंत्री व केंद्रीय ग्रामविकास मंत्री) ह्यांनी ह्या आयोगाची स्थापना झाल्याबद्दल माझी पंतप्रधान आटल बिहारी वाजपेयी यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा महाराष्ट्राच्या पंढरपूर शहरात ठेवण्यात आला होता. हा सोहळा भटक्या विमुक्त जनजातीच्या विशाल समुदायाच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजीने विठ्ठल भगवानाला साक्षी ठेवून या पवित्र शहरात लाखो मागासवर्गीय जीवन गतिमान करुन विकास करण्याची हमी दिली होती. संपूर्ण भारतभर विखुरलेल्या या समुदायाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्या सरकारचे हे पहिले पाऊल असून हे स्वप्न मी पूर्ण करण्याचे प्रतिज्ञा करत आहे. अशी घोषणा केली होती. आता त्यांचा स्वप्नाची पुर्तता करण्याची संपूर्ण संधी आली आहे. या संदर्भात पी. बिंदू नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ह्या आयोगाची पुन्हा स्थापना करण्यात यावे म्हणून एक निवेदन पाठविले आहे. या निवेदनाला महाराष्ट्राचे मागासवर्गीय कोटय़ातील केंद्रीय मंत्री तथा महसुल, कृषीमंत्री, एकनाथ खडसे यांना एक निवेदन देवुन प्रधान मंत्रीला शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात शिष्ठमंडळ सह एकनाथ खडसे महसुल तथा कृषीमंत्री यांचा नांदेड नगरीत निवेदन व पुष्पगृच्छ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी पी. बिंदु नाईक, कल्याण येजगे, बाबुराव लाड, अर्जुन चिंचोलकर, श्रीधर पांचाळ व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply