नाशिक येथे बन्जारा समाजाचा २२ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे

14390738_1087130074689960_6799314375484025682_n ठाणे, दि. १८; ऍट्रॉसिटी कायदा रद्द करणे म्हणजे मागास जातीतील समाजावर अन्याय करण्यासाठी खुला परवाना मिळणे. जो कायदा संसदेने पीडित, वंचित घटकाला संरक्षण देण्यासाठी संसदेने तयार केला, तो रद्द कसा केला जाऊ शकतो असा सवाल करत या कायद्याला आणि ओबीसी आरक्षणाला हात लावू देणार नाही असा इशारा राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. यासाठी विविध दलित संघटना आणि बंजारा समाजाचाच्यावतीने नाशिक येतेच काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेय पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

नाशिक येथे बन्जारा समाजाच्या एका ५ वर्षीय मुलीवर मराठा समाजातील इसमानाने अमानुष बलात्कार केला. त्या घटनेचा निषेध म्हणून संघटनेने २२ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोपर्डीच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये ऍट्रॉसिटी कायदा रद्द कारण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठीही हा समाज सरकारवर दबाव आणत आहे. प्रत्येक्षात राज्यात ज्या दलित अत्याचाराच्या घटना घातल्या आहेत त्यामध्ये अत्याचार करणारा वर्ग कोण आहे हे या समाजाच्या नेत्यांनी तपासावे. अत्याचार करणारा वर्गच जर रस्त्यावर मोर्चे काढून ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करून दलितांवर अत्याचार करण्याचा परवानाच मागत असेल तर हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. तसेच ओबीसी आरक्षणालाही हात लावू देणार नाही. असा इशारा आमदार राठोड यांनी दिला. बंजारा संघटनेचा निघणारा मोर्चा हा कोण्या समाजाच्या विरोधातील नसू तो पीडित समाजाला न्याय देण्यासाठी सरकारला जागे करणारा असणार आहे असेही ते म्हणाले. मात्र सध्या काही ठिकाणी निघत असलेले मोर्चे चुकीची मागणी करीत असून त्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते एक मराठा लाख मराठा म्हणत असतील तर आमच्याकडेही एक बंजारा ५ लाख बंजारा अशी ताकद आहे. त्यामुळं कोणी कोणाला चिथावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही राठोड यांनी केले. २२ सप्टेंबर रोजीच्या नासिक येथील मोर्चानंतर लवकरच मुंबईतही भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत हरिभाऊ राठोड यांच्यासह छाया राठोड, ओमकार जाधव, रामदास राठोड, लक्ष्मण मदार, सुभाष तंवर एकनाथ नाईक आदिमान्यवर उपस्थित होते.

Haribhau Rahod Press conferece at Thane

Leave a Reply