धामणगाव देव व पोहरादेवीच्या विकासासाठी प्रत्येकी 6 कोटी

धामणगाव देव व पोहरादेवीच्या विकासासाठी प्रत्येकी 6 कोटी
* तिर्थक्षेत्र विकासासाठी अर्थसंकल्पात घोषणा
* पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश
✒इन्साफ़ समाचार यवतमाल ✒
दि. 18 : दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज समाधीस्थळ तसेच जिल्ह्यालगत असलेल्या बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील सेवालाल महाराज समाधीस्थळाच्या विकासासाठी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात शासनाने प्रत्येकी 6 कोटींची तरतुद केली आहे. या दोनही स्थळांचा विकास आराखडा सादर झाल्यानंतर यासाठी आणखी निधी मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
या दोनही स्थळांच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत निधी मिळावा म्हणून पालकमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज वित्तमंत्र्यांनी विधानसभेत निधीची घोषणा केली. राज्यातील काही तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने या अर्थसंकल्पात‍ 36 कोटीची तरतुद केली असून त्यापैकी 12 कोटी रुपये धामणगाव देव व पोहरादेवीच्या विकासासाठी घोषीत केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांचे समाधीस्थळ संपुर्ण जिल्ह्याचे तिर्थस्थळ आहे. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जात असून या समाजाचे फार मोठे तिर्थक्षेत्र आहे. या दोनही ठिकाणी समाधीस्थळाच्या विकासासोबतच तेथे रस्ते, मुलभुत सुविधा, यात्री निवास, भक्ती निवास, ठिकठिकाणी सौंदर्यीकरण ही कामे करण्यात येणार आहे. शासनाने प्रत्येकी 6 कोटींची तरतुद केली असली तरी या स्थळांचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्येकी 25 कोटी इतकी रक्कम आराखड्याप्रमाणे मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले. पोहरादेवी येथे शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर सेवासागर उभारण्यात येणार आहे.
या दोनही स्थळांच्या विकास आराखडा शासनाचा नियोजन विभाग तयार करत असून लवकरच आराखड्याप्रमाणे विकासाची कामे होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

Leave a Reply