“देश स्वातंत्र झाला पण देशातील जनता स्वातंत्र नाही”

“देश स्वातंत्र झाला पण देशातील जनता अजुन स्वतंत्र नाही”

मित्र हो नमस्कार…
आज हा लेख लिहण्याचे कारण म्हणजे समाजहित म्हणुन लिहीत आहे.
कारण आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळवुन 7 दशकाच्या जवळ झाले तरी देशातील बहुशंख्य जनता आज पण स्वातंत्र नाही.
कारण आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यावर व साधारण कुटूंबातील व्याक्तीवर होनारे अन्याय अजुन संपलेले नाही.बहुजन समाजावरील अत्याचार अजुन होतच आहे.
खैरलांची प्रकरण,आंध्रप्रदेश,बंजारा समाजावरील,गोवा बंजारा समाजाचे घर व समाज मंदिर, जीवती जिल्हा चंद्रपुर, तावरजखेड जि.उस्मानाबाद,सांगली जि.नांदेड, बांगरा बंदी जि.वाशिम, पोखरी जि.यवतमाळ,नारळी कुरळी जि.यवतमाळ,दारव्हा प्रकरण काल परवा घडलेली कसबा पेठ पुण्यातील ताजी घटना घ्या.जर असेज बहुजन बंजारा समाजावर अन्याय होत राहिले तर कुठल्या मार्गाने आपण स्वातंत्र झालो.जर आपण सहशिलतेच्या वाटेने राहिलोतर असेच अन्याय होत राहिल.मि हिंसा सहन करण्यासाठी जन्म घेतलेल नाही लिहायच तर माझ्या समाजाला चांगल्या व प्रगतिशील समाज घडविण्यासाठी।जन्म घेतलय.
आपल्या समाजाला एकत्र याव लागेल तर हे हिंसा नष्ट होतिल.
दुसरी गोष्ट म्हणजे आपला बहुजन समाज आज मानसिकतेच्या गुलामगिरीत आहे. या गुलामगिरीतुन आपल्याला कुठल्याही परिस्थितितुन बाहेर पडावे लागेल अन्यथा आपल्या मुला बाळाला पण असेच गुलाम बनुन जीवन जगावे लागेल.
मित्रहो असे अन्याय अत्याचार का होतात..?
आपण व आपला समाज एकत्र नाही आपआपल्या मध्ये एकतेचे भाव निर्माण नाही, आपल्या समाज बांधवाची आपणच कुठनितीने विचार करून संपविण्याचे विचार करतो तर आपल्या समाजावरील अन्याय अत्याचार कसा कमी होनार.
जो पर्यंत आपण स्वता समाज वादी बनुन स्वता समाजातील सर्व बंधु वर विश्वास करत नाही तो पर्यंत आपल्या वरील होणारे अन्याय अत्याचार कमी होनार नाही.
आपला देश कधी ही स्वातंत्र नव्हता.
सर्वांत पहिले आपल्या देशावर म्हणजेच आपल्यावर राजा महाराज्यानी राज्य केले,त्या नंतर काही काळ मुघल साम्राज्य होता, तो संपत नाही कि आपल्याच बुचक्या लोकांनी इंग्रजाला आपल्या देशात प्राचारण केले त्यानी कमित कमी 150 वर्ष आपल्या रक्ताची लाही लाही करून स्वताची घरे भरून निघुन गेले.
आपला देश पोकळ करून निघुन गेले आपला शरीर काम करण्याची शक्ती कमी करून गेले.आपल्याला असी वेदना देऊन गेले ती वेदना आपण कधी ही विसरनार नाही.
मित्र हो आपल्यातील मानसिकतेची गुलामी जर कमी करायची असेल तर आपल्यालाच करावी लागेल.
त्या करिता आपल्याला सर्वात पहिले एकतेच्या स्वरूपात उभे रहाव लागेल.
“शिका संघटीत व्हा संघर्ष करा”
जय सेवालाल…
धन्यवाद…
स्वातंत्र देशाच्या सर्व समाज बांधवांना प्रजासत्ताक दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा..।
“जय हिंद जय भारत”

~ गोर कैलास डी.राठोड
सामाजिक कार्यकर्ता
मो.9819973477

image

Posted from WordPress for Android