दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांची भेट

11 जानेवारी 2018, बंजारा समाजाचे शिस्तमंडल, श्री मोतीराज राठोड, श्री ग ह राठोड, श्री अविनाश चव्हाण, राजपाल राठोड, बिपीन, नाईक, अनिल चव्हाण, निलेश चव्हाण व इतर बंजारा समाजाचे प्रतिनिधी यांनी औरंगाबाद, सुभेदारी रेस्ट हाउस येथे दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. समाजाच्या विविध समस्येवर चर्चा झाली. बंजारा समाजाला भारतीय संविधान प्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थेमध्ये न्यावं मिळावा यावर चर्चा झाली.याच वेळी श्री अरविंद केजरीवाल साहेबानी तेथे उपस्थित असलेले दिल्लीचे सामाजिक, social welfare मंत्री श्री गौतम यांच्याशी भेट घालून समाजाच्या समस्येवर, व मागण्यावर लक्ष घालून समाजाला सर्वतोपरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

चर्चा खूप सकारात्म झाली.
याप्रसंगी शिस्तमंडळाने पुष्पगुच्छ, श्री मोतीराज राठोड सरांनी भटक्या विमुक्तांच्या जीवनावर आधारित असलेले त्यांचे लिखित पुस्तक भेट दिले व श्री बिपीन नाईक यांनी श्री अरविंद केजरीवाल याची सुंदरशी फोटोफ्रेम भेट दिली.
श्री अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल शिस्तमंडळाने धन्यवाद मानले.

या कार्यक्रम प्रसंगी, श्री अरविंद केजरीवाल साहेबांना Z प्लस सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे, सुरक्षाच्या कारणामुळे पोलिसांनी बऱ्याच लोकांना भेटण्यासाठी मज्जाव घातल्यामुळे, समाजातील इतर बरेच मान्यवरना मुख्यमंत्र्यांना भेटता येऊ शकले नाही याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. माझा प्रयत्न सर्वांची भेट घालून देण्याचा होता पण पोलिसांनी नकार दिल्यामुळे सर्वाना मुख्यमंत्र्यांना भेटविणे शक्य झाले नाही.बतरीही ज्याची भेट झाली नाही त्याबद्दल मी क्षमस्व व तुमची माफी मागती, यामागे कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता.

विनम्र धन्यवाद
सुभाष तंवर-9699086864
AIBSS,
भारतीय सेवा नाका कामगार संघटना
संविधान मोर्चा,
गोरबंजारा राजकीय परिवर्तन मंच,
आम आदमी पार्टी

Tag Aam Adami Party, AAP MAHARASHTRA

One Comment
  1. Avatar

Leave a Reply