दिलीपराव जाधव यांची विजयाची परंपरा कायम

वाशिम (प्रतिनिधी) – अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दिलिपराव जाधव यांची संचालक पदासाठी झालेल्या सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीत दिलीपराव जाधव यांनी सर्वात जास्त मते घेऊन त्यांच्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. ह्या झालेल्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात बंजारा समाजाचे अवघे 4 मत असताना सुध्दा दिलीपराव जाधवानी हि संचाक मंडळाची निवडणुक लढऊन विजय मिळवुन प्रस्तापित मंडळीवर मात करुन सहकार क्षेत्रात बहुतानी विजय प्राप्त करणारा एकमेव बंजारा नेतृत्व म्हणुन दिलिपराव जाधव यांची वाशीम- अकोला जिल्ह्यात ख्याती आहे. diliprao-jadhavआता सध्या वाशिम जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ. पानुदेवी जाधव ह्या दिलिपराव जाधव यांच्या सुविध पत्नी आहे. दिलीपराव जाधव यांची राजकीय वाटचाल पंचायत समितीच्या निवडणुकी विजयापासुन झाली व ते 1992-97 पर्यंत पंचायत समितीच्या उपसभापती पद भूषविले व नंतर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढऊन सलग 5 वेळेस विजय प्राप्त केले आहे. त्यांनी वाशिम जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती, समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष व नंतर आडिच वर्षे अध्यक्ष म्हणुन पद भुषविलेले आहे. दिलिपराव जाधव यांच्या ह्या विजया बदल मालेगाव येथील बंजारा समाजा तर्फे जाहिर सत्कार करण्यात आले. ह्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणुन संतोषभाऊ राठोड, राजुनाईक पं.स. सदस्य, संजय पवार, प्रल्हाद महाराज, रमेश चव्हाण, कनिराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमात श्रावण जाधव, संतोष राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply