तेलंगणा राज्यातील गोरबंजारा/लंबाडा या समाजावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी नागपूर येथे बंजारा समाज बांधवांची तातडीची बैठक संपन्न

*तेलंगणा राज्यातील गोरबंजारा/लंबाडा या समाजावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी नागपूर येथे बंजारा समाज बांधवांची तातडीची बैठक संपन्न*
–——————————————-
नागपूर बंजारा लाईव्ह प्रतिनिधि : तेलंगणा राज्यात आदिलाबाद येथे दि.15 डिसेंबर रोजी गोंड व कोया ह्या आदिवासी जमातींकडून बंजारा/लंबाडा समाजावर अनुसूचित जमातीच्या आरक्षणावरून आकसापोटी हल्ला करण्यात. त्यावर तेलंगाणा बंजारा बांधवांना धैर्य व साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय मान्यवरांसमवेत सर्व सामाजिक संघटनांची बैठक ना.संजय राठोड,महसूल राज्यमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत माजी मंत्री,मनोहर नाईक,माजी खासदार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, आमदार प्रदिप नाईक, आमदार डाॅ.तुषार राठोड,राजू नाईक राष्ट्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया बंजारा सेवा संघ , डॉ टी सी राठोड, संदेश चव्हाण आदिसह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्राधान्यक्रमानुसार सर्वप्रथम मंत्री,आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधींसह हिवाळी अधिवेशनातच मुख्यमंत्री यांना निवेदन देणे,राज्यातील सर्वच तालुक्यात व जिल्हात दि.26 डिसेंबर 2017 रोजी एकाच दिवशी दुपारी 12 वाजता अनुक्रमे तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणे व राज्यातील मंत्री,आमदार,संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी व शेजारच्या राज्यातील प्रमुख प्रतिनिधींसमवेत दि.2 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथे बैठक घेऊन दिल्ली येथे जन आंदोलन करण्याची तयारी करण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले.बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे प्रमुख पदाधिकारींची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply