तांडेसामू चालो शिष्यवृत्ती

 

तांडेसामू चालो शिष्यवृत्ती
:न्यायवंचिताच्या शैक्षणिक उत्थानाचा शाश्वत अनुबंध.
: सामाजीक बांधीलकीचा “एक पाऊल पुढे”
आज 2 अॉक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंती.त्यांची *खेड्याकडे चला* ही संकल्पना आजही इतिहासात प्रेरणादर्श आहे.त्यातून खेडी समृद्ध होत आली.खेड्यातल्या घटकाचा अस्तित्व,प्रभाव आकारासही आली.

परंतु त्यांच्या या संकल्पनेत  प्रवाह बाहेरचे जीवन जगणार्याचा न्यायवंचिताचा स्पर्श नव्हता.अन् येणार तरी कसा.? हे प्रखर वास्तव आहे.

तांड्याला स्विकारलेच नाही किंवा सामाजीक पर्यावरणाचा भविष्यवेध चिकित्सकतेने घेताच आले नाही.हे देखिल तेवढेच सत्य.

तांड्याच्या समग्र पुनर्रुत्थानासाठी पहिल्यांदाच *तांडेसामू चालो*सारखी अभिजात संकल्पना पुरोगामी महाराष्ट्रात रुजली.ही  अतिशय आनंदाची व प्रेरणादर्श बाब आहे.

*तांडा ग्लोबल व्हावा.प्रवाहात टिकावा.विचाराने समृद्घ व्हावा.संविधानाच्या कलमाने साक्षर व्हावा.समाज अस्तीत्व आणि संस्कृती वेधक ठरावी* अशा संरचनात्मक,विकेंद्रीत व अभिजात मुल्यानी *तांडेसामू चालो* या संकल्पनाची मांडणी,बांधणी आणि प्रत्यक्षकृती भविष्यातही अबाधित राहिल.

*तांडेसामू चालो*अभियानाशी कित्येक भावनिक जुळलेली आहेत.आपणही तांड्याची वेदना जाणून घेऊया हि भावना उत्तरोत्तर समाजात विकसित होत आहे.हेच या अभियानाचे मोठे फलित आहे.

*तांडेसामू चालो* अभियान सर्व तांडा हितचिंतकाच्या सहयोगाने गतिशिल झाल्याशिवाय  तांडा खर्याअर्थाने ”बुलेट ट्रेन” ची गती पकडू शकणार नाही.

समाजातील नोकरदार वर्ग व सामाजीक बांधीलकी जोपासणार्यानी या ऐतिहासिक कार्यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सहयोग द्यावा.

अतिवंचितासाठी *तांडेसामू चालो शिष्यवृत्ती* या pay back to society उपक्रमात सहभागी होऊन,या संकल्पनेला प्रेरित होऊन मदतीचा हाथ पुढे करुया.

मंदिरात किंवा उत्सवातील डिजेपेक्षा आणि दानपेटीपेक्षा *तांडेसामू चालो शिष्यवृत्ती* कडे टाकलेले एक पाऊल निश्चितच परमानंद व पुण्यश्लोक ठरेल.

दिपावलीचा एक दीप न्यायवंचिताच्या जीवनात लावूया,असे आवाहन करण्यात येत आहे.
✍🏻 *तांडेसामू चालो अभियान*

– ध्यास समग्र पुनर्रूत्थानाचा.!

ग्लोबल तांड्याचा..!!
टिप : आजच्या दैनिक देशोन्नतीमध्ये सर्व आवृत्तीमध्ये *तांडेसामू चालो शिष्यवृत्ती*चे वृत्त मुख्य पानावर (2) प्रकाशित झालेले आहे.अवश्य वाचा.

तांडेसामू चालो अभियान संपर्क : 9850131368

email : [email protected]