तांडा वसाहत विकासाच्या संघर्षाला यश वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेत सुधारणा. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात “तांडेसामू चालो” अभियानाची दखल घेत तांडा विकासासाठी निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधले होते.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेत नव्याने सुधारणा करुन पायाभूत सुविधासाठी निधीमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .आता 10 लक्ष निधीची तरतूद नव्याने करण्यात आली आहे.
दि.13 डिसेंबर 2017 रोजी विधानभवनात आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात “तांडेसामू चालो” अभियानाची दखल घेत तांडा विकासासाठी निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधले होते.
यामध्ये आ.अमिता चव्हाण,आ.जोगेंद्र कवाडे,आ.अमर राजूरकर , आ.डी.पी.सावंत यासह अन्य आमदारांचा सहभाग होता.
शिवाय विधिमंडळात आमदार हरिभाऊ राठोड यांनी तांडा पुनरुत्थानाचा रोल मॉडेल ठरणारे तांडेसामू चालो अभियानाचा उल्लेख करत तांडा विकासासाठी मुद्दा देखिल उपस्थित केला होता.
शिवाय तांड्याच्या पुनरुत्थानासाठी तांडेसामू चालो अभियान सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यापूर्वी तांडा वाडी वस्त्याच्या पायाभूत सुविधेसाठी निधी अपुरी ठरत होती.त्यामुळे निधी वाढवून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनांची व्याप्ती वाढवणे गरजेचे होते.
ही बाब लक्षात घेता शासनाने तांडा सुधार योजनेचे सुधारीत शासन निर्णय घेन्यात आले आहे.ते याप्रमाणे
50 ते 100 लोकसंख्याच्या तांडा करिता 4 लक्ष..
101 ते 150 लोकसंख्या करीता 6 लक्ष. तर
151 पेक्षा अधिक लोकसंख्या करीता 10 लक्ष रुपयाच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
यासाठी विमुक्त भटक्या समाजातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीचा सहकार्य देखिल लाभला.
*वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेच्या जिल्हा समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून विमुक्त भटक्या मागासवर्गीय समाजातून प्रतिनिधी घेण्यात यावे.*
*तांडा प्रश्नांवर एक स्वतंत्र अभ्यास कमिटी गठित करावी.तांडा पुनरुत्थानाचा रोल मॉडेल तांडेसामू चालो अभियान शासन स्तरावर कार्यान्वीत करावे.*
*रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर vjnt साठी स्वतंत्र सामकाई घरकुल योजना सुरू करण्यात यावी.*
अशी मागणी आता पुढे येत आहे .
विमुक्त भटक्या समाजांच्या संविधानिक हक्कासाठी सर्वसमावेशक मोट बांधने गरजेचे झाले आहे. हे विशेष ..!

Abc

गजानन धावजी राठोड

प्रतिनिधि – बंजारा लाईव्

9619401377

Leave a Reply