तलाठीसह लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

♦♦ तहसिल कार्यालयातील तलाठी आणि लिपिकाला ३ हजारांची लाच घेताना पकडले

♦♦ जमिनीचे कागदपत्र देण्यासाठी मागण्यात आले होते पैसे

♦♦ तलाठी शंकर साळवी आणि लिपिक नितीन पाटील अशी दोघांची नावे

♦♦ शंकर साळवी यांच्या वतीने पैसे घेतांना लिपिक नितीन पाटीलला ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले

श्री. सतिष एस राठोड ✍

  • कल्याण:- यातील तक्रारदार यांनी त्यांच्या रुंदी ता. कल्याण येथील जमिनीचे फेरफारचे कागदपत्रे मिळण्यासाठी अर्ज केला होता. तसेच सदर कागदपत्र तक्रारदार यांना पुरविण्यासाठी तलाठी शंकर नरसिंह साळवी यांनी सदरील तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदरील तक्रारदार यांनी अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्याकडे तक्रार नोंदविली होती.
  • तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, सदरील लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी सापळ्याचे आयोजन करून तलाठी शंकर नरसिंह साळवी यांच्यासह लिपिक नितीन प्रभाकर पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून ३ हजार रुपये लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले.