डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्काराने अशोक गणेश राठोड सन्मानित

श्री. सतिष एस राठोड ✍

मुंबई :- संस्थापक डॉ.सनी शाह यांची इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कांऊसिल ( संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत विशेष स्थान ) च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवॉर्ड- २०१९ हॉटेल सी प्रिन्सेस जुहू मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.

अभिनेते राहुल रॉय यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अशोक राठोड, शेजारी डॉ. सनी शाह

त्यानिमित्ताने विविध देशातील व राज्यातुन आलेल्या वकील, डॉक्टर,राजकीय नेते, आयकर विभाग, खेळाडू, वास्तुविदया, विशारद,अभिनेते, टीव्ही अभिनेते, अभिनेत्री, फॅशन, छपाई माध्यमाचे प्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक व नामांकित व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याची दखल घेत. ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन ओढरे,ता. चाळीसगाव ( जळगाव ) चे संस्थापक अध्यक्ष-अशोक गणेश राठोड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार हिंदी चित्रपट अभिनेता राहुल रॉय यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले व सोबतच पद्मश्री अनुप जलोटा, प्रेम चोप्रा, राहुल रॉय, जॉनी लिव्हर, गायिका मधूश्री, गायक व अभिनेते अरुण बक्षी, बिग बॉस फेम जसलीन माथूर, निकिता रावल, एकता जैन, रहमान खान, सलोनी, सुनील पॉल,योगेश लखानी (ब्राइट ऍडवरटाइसमेन्ट cmd) राजेश राऊत, पंडित फंगाळ, सायरस (देशदूत- ऑस्ट्रेलिया) मोसेन असुर (डिरेक्टर ऑफ इराक) सेन्हा उलाला (अभिनेत्री) कोमल सिन्हा (मिस इंडिया २०१७) वैष्णवी महंत (शक्तिमान) गुलशन पांडे (क्राईम पेट्रोल) कोमल खान (अभिनेता) रामा मेहरा (डायरेक्टर) व इतर मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले.