डाॅ.तानाजी चव्हाण यांना,राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार

कल्याण,ठाणे:  वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिक पणाने समाजिक कार्य करत असलेल्या व्यक्तींना शासनाकडून किंवा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून,त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी गौरविण्यात येत असतो.व राष्ट्रीय मानवसेवा चिकत्सा रत्न पुरस्कारने गौरविण्यात आलेल्या डाॅ.तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन आमचे प्रतिनिधी सतिष राठोड यांनी संग्रहीत केलेली माहिती.
                राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार हे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या डाॅक्टरांना देण्यात येतो.असा हा पुरस्कार सोहळा दि.२१ मे या दिवशी औरंगाबाद येथे पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.ना गिरीषजी महाजन ( जलसंपदा मंत्री ), मा. हरिभाऊ बागडे (महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष), मराठी चित्रपट नायिका मानसी नाईक उपस्थित होते.आणि  डाॅ.तानाजी चव्हाण यांना मा. हरिभाऊ बागडे (महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष) यांच्या हस्ते राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

* डाॅ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण *
          डाॅ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण एका छोट्याश्या खेडेगावातून झाले असुन प्राथमिक शिक्षणातही स्काॅलरशिप व नवोदय परिक्षा यशस्वी झालेले आहेत.

* डाॅ.चव्हाण यांचे वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय सेवेतील वाटचाल *
           MBBS पुणे विद्यापीठ, PGDHSM औरंगाबाद,DFP मुंबई, स्री व पुरुष नसबंदी शस्रक्रिया तज्न्य. तसेच पुणे विद्यापीठातून MBBS चांगल्यागुणाने उत्तीर्ण झाल्यानंतर,शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामाची सुरुवात.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नासिक येथिल बोलठाण व न्यायडोंगरी गांव येथे वैद्यकिय अधिकारी तसेच नांदगांव येथे तालुका आरोग्य अधिकारी (THO) पदावर २००९ पर्यंत कार्यरत.व २००९ पासुन जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुका येथे THO  जून २०१४ पर्यंत कार्यरत. जून २०१४ नंतर आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत.

* डाॅ.चव्हाण यांना वैद्यकीय सेवेतील मिळालेले पुरस्कार *
             सन २०११-१२ मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, व यापूर्वी शासन सेवेतील आदर्श आरोग्य अधिकारी ,आदर्श सर्जन पुरस्कार व आदर्श कारभार पुरस्कार ( Administrator Award )  असे अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले असुन शासन आरोग्य सेवेत उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणूनही गौरविण्यात आललेे आहेत.
           मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री मा.ना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नागपूर प्रशिक्षण संस्था येथे Best Monitor Award ने सन्मानित झालेले आहेत.
          प्राथमिक शिक्षण छोट्याश्या खेडेगावातून झाले असुन, परिस्थितीवर मात करुन आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे.त्यांच्या पत्नी सुध्दा डाॅक्टर असुन,सध्या विक्रीकर विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

* डाॅ.चव्हाण यांचे “जगरत्न प्रतिष्ठान” संस्था व कार्य *

        डाॅ.चव्हाण यांचे “जगरत्न प्रतिष्ठान” ही संस्था सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.
         “जगरत्न प्रतिष्ठान” यांचे जनसेवा आरोग्य संस्थेमार्फत गोर-गरीब ,गरजू, अनाथ व वृधांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य करीत आहे.तसेच डाॅ.तानाजी चव्हाण व सौ. डाॅ.सविता चव्हाण यांचे तरुणांसाठी वयात येतांना घ्यावयाची काळजी, आणि ” दशा व दिशा ” या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबीर राबवितात.
            
* भविष्यात या सुविधा मोफत देण्याचा मानस *
         भविष्यात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त दवाखाना, हाॅस्टेल, वृधाश्रम व तरुणांना मोफत मार्गदर्शन व सर्व आरोग्याशी निगडित समस्यांवर मार्गदर्शन व सल्ला केंद्र उभारण्याचा मानस आहे.
         डाॅ.तानाजी चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या ” महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ” व वाचक परिवारातर्फे हार्दीक शुभेच्छा………

Leave a Reply