टंचाई परिस्थितीच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करावी – संजय राठोड

हिंगोली – टंचाईच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना राबविणे हे एक टीमवर्क आहे. तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परस्परामध्ये समन्वय ठेवून त्याची प्रभावीपणे अं लबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार गजानन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी आदी उपस्थित होते. श्री.राठोड म्हणाले, जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ करुन योजना कार्यान्वित कराव्यात. तसेच सदरील योजना पाणी पुरवठा समित्यांची स्थापना करुन त्यांच्याकडे हस्तांतरित करावीत. MLA Sanjay Ratrhod

जिल्ह्यातील बंद असलेल्या 181 पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करुन त्या कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. तसेच पाणी पुरवठा समित्यांनी अपूर्ण ठेवलेल्या योजनांची चौकशी करावी. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या चाराबाबतचे योग्य नियोजन करावे व शेतकर्यांकडून चारा छावणी सुरु करण्याची मागणी आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. जिल्ह्याला दोन टप्प्यात सु ारे 132 कोटीचे अनुदान शेतकर्यांना मिळालेले आहे. त्याचे वाटप योग्य पद्धतीन करावे. तसेच जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतंर्गत मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू करावीत, अशा सूचना श्री. राठोड यांनी केली. राज्यातील पाच हजार गावांची जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली असून याकरिता शासनाने 800 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती मधील दहा टक्के निधी याकरिता राखीव ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच सर्व यंत्रणांना या अभियानात सहभागी होऊन कार्यवाही करावी. याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, असेही श्री. राठोड यांनी सांगितले. यावेळी श्री. राठोड यांनी पाणी व चारा टंचाई, बंद पाणी पुरवठा योजना, तलाठी कार्यालये व निवासस्थाने, तहसील इमारती, ई-म्युटेशन, ई-स्कॅनिंग, रोहयो, कृषि, जलयुक्त शिवार अभियान, दुष्काळ अनुदान वाटप, विविध विभागांच्या रिक्त पदांची माहिती आदीबाबत सविस्तर आढावा घेतला.

Leave a Reply