जागतीक महिला दिन विशेष,महिला सर्जनची बॉडी बिल्डिंग मध्ये चमकदार कामगिरी ‘मुंबई श्री’ स्पर्धेत पटकावले रौप्यपदक पहिली भारतीय महिला सर्जन-शरीरसौष्ठवपटू

महिला दिन विशेष

महिला सर्जनची बॉडी बिल्डिंग मध्ये चमकदार कामगिरी
‘मुंबई श्री’ स्पर्धेत पटकावले रौप्यपदक
पहिली भारतीय महिला सर्जन-शरीरसौष्ठवपटू

मुंबई, ता. 7 : शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात (बॉडी बिल्डिंग) मनाची मानली जाणारी, ‘मुंबई श्री’ स्पर्धा नुकतीच पार पडली. यंदाची स्पर्धा मात्र एका विशेष कारणामुळे आगळी-वेगळी ठरली. ते कारण म्हणजे या स्पर्धेच्या रौप्यपदकावर आपलं नाव कोरणाऱ्या डॉ. माया राठोड! पेशाने प्रसूतीतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. माया राठोड या भारतातल्या पहिल्या महिला सर्जन-बॉडीबिल्डर ठरल्या आहेत. सातारा येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेतही त्या सहभागी होत आहेत.

गेल्या 8 वर्षांपासून आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत शरीर कामावणाऱ्या डॉ. माया राठोड यांना 3 वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा मुलगी झाली. या प्रसूती दरम्यान, सुमारे 80 किलोपर्यंत पोहोचलेले वजन अवघ्या 36 महिन्यांत घटवून, डॉ. राठोड यांनी रौप्यपदकापर्यंत मजल मारली.

शालेय जीवनात सलग दोन वर्षे ‘बेस्ट एथलिट’ पुरस्कार, तसेच किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉ माया यांना शिक्षणासोबतच खेळातही आपले नाव कमावण्याची ईच्छा होती. मात्र,पुढे उच्चशिक्षण, डॉक्टरी पेशा, संसार- दोन मुली या साऱ्यात व्यस्त झालेल्या डॉ. माया राठोड यांना आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. सुमारे 8 वर्षांपूर्वी, श्रीकांत दुलम या बॉडीबिल्डर मित्रासोबत काही स्पर्धा बघायला गेल्यावर डॉ. माया आपोआप या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या. पुढे हाच मित्र त्यांचा प्रशिक्षक बनला.

मुंबईतील गोरेगावच्या, ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’त जन्मलेल्या डॉ. राठोड यांनी कोल्हापूरच्या डी वाय पाटील मेडिकल कोलेजमधून एमबीबीएस ची पदवी घेतली. पुण्याच्या रुबी हॉल क्लीनिक येथून गायनेकॉलॉजी चा डिप्लोमा पूर्ण केला. सध्या त्या गुजरातच्या भरुच येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये सर्जन म्हणून कार्यरत आहेत.

कोट-
“आज भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत. मात्र, एक महिला केवळ एकच नव्हे तर विविध क्षेत्रातही एकाच वेळी करिअर घडवू शकते, हे मी सिद्ध करू शकले, याचा मला आनंद आहे. या यशाचं श्रेय मी माझे आई- बाबा, नवरा डॉ. अमित बोबडे, माझे प्रशिक्षक श्रीकांत दुलम, मला संधी देणारे राजेश सावंत आणि शाम रहाटे सर यांना देते. पहिली भारतीय महिला सर्जन- बॉडीबिल्डर म्हणून माझ्या नावाची इतिहासात होणारी नोंद म्हणजे महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय आहे.”
– डॉ. माया राठोड, प्रसूतीतज्ञ

अधिक माहितीसाठी संपर्क-
डॉ. माया राठोड-
7028034422

सौजन्य- गोर कैलास डी राठोड ठाणे,

संपर्क 9326791504

Leave a Reply