जळगांव जिल्ह्यातील बंजारा समाजाची परिचय पुस्तिका काढणार – अशोकराव चव्हाण

  • जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे दि.२५ ‘डिसेंबर २०१८ रोजी परिचय पुस्तिका प्रकाशित होणार आहे.

जळगाव :- जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था ही जळगांव जिल्ह्यातील बंजारा समाजातील बांधवांसाठी आतापर्यंत विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत आली आहे.त्यामधे-कै.वसंतरावजी नाईक जयंती/पुण्यतिथी महोत्सव,संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव,शालेय विद्यार्थी क्रिडा स्पर्धा,समाज प्रबोधनपर जनजागृती मेळावा,समाजातील प्रलंबीत समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार,इ.प्रकारचे कार्य ही संस्था करीत आहे.या बंजारा समाजाचे युवा समाजसेवक तथा राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-अशोकराव चव्हाण हे या संस्थेचे चेअरमन आहेत.

दि. १९’आॕक्टो.रोजी संस्थेचा 3’रा वर्धापन दिवस आहे. यानिमीत्त एक आगळा-वेगळा उपक्रम संस्थेतर्फे आयोजित केला आहे.संस्थेतर्फे जळगांव जिल्ह्यातील बंजारा समाजातील नामवंत “डॉक्टर,रक्तपेढी(रक्तदाता),शिक्षक,प्राध्यापक,इंजिनियर,वकील शैक्षणिक संस्था चेअरमन,व विविध क्षेत्रातील समाजसेवक तसेच सामाजिक क्षेत्रातील गरीब,गरजु बांधवांसाठी झटणार्या समाजबांधवांची “परिचय पुस्तिका” अखिल भारतीय चैतन्य साधक परीवार चे संस्थापक तथा आध्यात्मिक गुरु ब्रम्हलीन प.पु.लक्ष्मणचैतन्यजी बापूजी यांच्या 9’व्या पुण्यतिथी महोत्सव निमीत्त “दि.२५’डिसें.-२०१८” रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

तरी जळगांव जिल्ह्यातील ज्या समाजबांधवांना या ‘परिचय पुस्तिका’ मधे आपल्या ”दवाखाना,शैक्षणिक संस्था,वकील बंधू,शिक्षक,प्राध्यापक,इंजिनियर,रक्तदाता”,तसेच सामाजिक संघटनांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपली जाहिरात / परीचय पत्र द्यायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन-अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

१) मा.अशोकराव चव्हाण (चेअरमन)- 9022234565

२) विठ्ठल चव्हाण (सचिव)-7020352710

३) मा.अजय पवार(संचालक)- 9049923997

४) मा.अनिल नाईक 9689226833

५) मा.गणेश राठोड सर 9766299460

६) मा.प्रविण चव्हाण 9545170089

७) मा.भरत पवार 8550907853

८) मा.केवलसिंग तंवर 9664578217

९) मा.ईश्वर तंवर- 9923483179

१०) मा.सतिष राठोड,पत्रकार- 8976293601, 7977553903

११) मा.गोकुळ राठोड 8600096883

Leave a Reply