जय भवानी जय सेवालाल अध्याय-22 वा सेवाभायार बोल

सेवादास महाराज हैद्राबाद या ठिकाणी असताना महाराजाना दरबारात येण्यासाठी राज विनंती करतो आणि सांगतो महाराज आपले चरण पवित्र आहेत. त्या करिता आपले चरण आमच्या दरबारात लागू द्या म्हणून नमस्कार करुन सांगतात तुम्ही यावे ही माझी खूपच इच्छा आहे. शंका, कुशंका न करता राजमंदीरा यावे तुम्ही जशी म्हणाले तशी व्यवस्था करु. तेव्हा संत सेवादास महाराज विचार करुन येण्याची सहमती दिली. तेव्हा सेवादास महाराज म्हणतात मी आपल्या दरबारात येतो. पण आमचे काही नियम आहेत.

त्या नियमाला आडकाही नको. ते नियम कोणते आहेत तर आमचे शीर कदापि कोणासमोर नमणार नाही फक्त माता भवानी शिवाय कोणासमोर नमले नाही. त्या करिता आपल्या समोर शीर नमणार नाही. तेव्हा राजा हात जोडूनी सांगतो की तुमचे जे नियम आहेत. ते मला सर्व मान्य आहेत. तरी कृपाकरुनी संतोषनी यावे आमच्याकडे. तेव्हा सेवादास महाराज दरबारात जाताना आपले शीर कोणासमोर नमविले नाही व जातना सोबत लखूखेतावत, सोमाभंगी, रुपा रामावत, लखामाजंगी, भोजा जाधव व केसाजंगी आणि नरसींग नाईक इतक्या जनाना सोबत घेवून दरबारात निघाले. तेव्हा राजानी, सेवादास महाराज यांना सिंहासनावर बसवले व सेवकाची म्हणजे सेवादास महाराजाची पुजा केली तुम्ही लोक भाग्यवान अहात, पुण्यवान आहात. कितीही वर्णन करावे तेवढे कमीच आहे. अशा प्रकारे राजा वर्णन करतो.

सेवादास महाराजानी निजाम यांना आपले काही नियम सांगतो.तेव्हा ते राजाने मान्य केले. मग आपण बंजारा कुळात जन्माला आलो आहोत. सेवादास महाराज आपले संत म्हणून समजतो, जय सेवालाल असे म्हणतो, पण ज्या सेवादासानी राजापुढे आपले शीर नमविले नाही राजापुढे लाचार झाले नाही, पण आज आपले काही बंधू पावशेरीसाठी, आपले मस्तक अनेकाच्या चरणी ठेवतात. हे माझ्या संताचे अपमान नाही का? करिता सेवादास महाराजानी जे नियम सांगितले की कोणासमोर लाचार, दीन दुबळा राहता कामा नये. कारण आपले कुलदैवत भवानी आहे.

भवानी देवी असताना मला काही भिती नाही. राजानी सेवादास यांचे वर्णन करतात तेव्हा राजा हात जोडूनी सेवादास महाराज समोर उभे राहतो आणि सांगतो, काही तरी मागा. मी भेट मुक्त हातानी देतो. तेव्हा सेवादास हासूनी म्हणतात. तुझी देणगी नको आम्हाला. सगळा जगच माझा प्रपंच आहे. तुझी देणगी दिलेले पुरेल का मला. तेव्हा राजा सांगतो महाराज चार खुटाची माझी जहागीरी आहे. काही कमी नाही अनुमात्र जरी दुष्काळ पडला तरी धान्य पुरवितो त्या ठिकाणी. तेव्हा सेवादास महाराज राजाना म्हणतो तुम्हास काही तरी भासत आहे.

तु अनुमात्र तु लाजू नकोस. तेव्हा राजा सेवादास सांगतो, कृपा करुनी आमच्यावरी हेच मागतो बुद्धकरी, काही करुन भेट आमुची स्वीकारावी. तेव्हा राजाची भक्ती पाहूनी सेवादास महाराजानी संतोषाणी अनुमती दिली. तेव्हा राजानी, भेट म्हणून, ढाल, पे इ. दिले व सोबत नाणे अर्पिले दश सहत्र, आणि हैद्राबाद येथील एक गल्ली दिली. राजाने ही गल्ली जगदंबेशी अर्पिले व त्याचे नाव ठेवले, महाराज गंज म्हणूनी आज महाराज गंज गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हा राजा सेवादास महाराजाना नमस्कार करत तेव्हा सेवादास महाराजानी निजामाशी आर्शीवाद दिला. व सांगतात जेव्हापर्यंत जगदंबेची भक्तीकरशील तोपर्यंत तुला भिती कशाची. सेवादास महाराज यांनी सगळ्याना निरोप देवून निघाले मार्गी चालत आले नागपूर प्रांत समस्ता. वर्षा ऋतु त्यावेळेस म्हणजे श्रावण महिना या काळात वर्षा ऋतु असतो. यावेळेस चांदा बलारशापाशी. सेवादास महाराजाची सेना आली आणि पैनगंगेच्या तिरावरी छावणी दिली. पैनगंगेच्या तीरावर आल्यावर सेवादास सगळ्यांना सांगतात. पावसाळ्याचे दिवस आलेत. या ठिकाणी ढोराना खावयास चारा खूप आहे. पाणी पण आहे या करिता या ठिकाणी राहून चातुर्मास काढू या ठिकाणीच हे जे ठिकाण आहे. ते रम्य आहे. असे दुसर्या ठिकाणी नाही म्हणून चार महिने येथेच काढूया हे म्हणजे सर्वांना पटले म्हणून सर्वांनी सेवादास महाराजाचा जयजयकार करतात.

सेवादास गंगेच्या तीरावर बाळ गोपाळाच्या संगे राहतात. याच परिसरात बालाजीचा भक्त राहतो. व त्याचे नाव धर्मिसात होते. व सेवादास, भक्त हे रत्न आहेत. व गंगातीरी येवोनी राहिले आहे हे कळाले, व त्याचे सामर्थ्य खूप आहे. तेव्हा धर्मिसाताला वाटले. आपल्या जवळ देवीचा भक्त राहतो तर त्याच्या दर्शनासाठी जावू चला धर्मिसात सेवादास दर्शनासाठी जातात. तेव्हा अचानक जगदंब डेर्याचा कळस चमकतो व दिसतो. लोक आनंदाने म्हणाली सदिच्छा पूर्व काळी मग धर्मिसात सेवकापाशी जावूनी छावणीपाशी सेवादास यांना वंदन करतो व म्हणतो की भव्य मुर्ती बघून सौख्य वाटले सगळ्यांना आलेल्या सगळ्यांना सेवादास यांनी अपार असे प्रेम दिले. व सांगतात आता रामचंद्रसात कानहोबाचा थोर भक्त त्याला सांगा वृत्तांत आले भेटायला सेवादास अशी वृत्तांत आले भेटायला सेवादास अशी वृत्तांत मिळता आले रामचंद्रसात ग ं ग ा त ाr र ाr भ o ट ण् य ा स ा ठ ाr आपले लोक घेवून शोध करीती तेव्हा सेवादास यांची भेट झाली तेव्हा सार्थकता वाटली चिताशी तेव्हा त्यांनी वाटले आता येथेच रहावे. तीन संत वेगवेगळ्या ठिकाणाचे एके ठिकाणी मिळाले. तेव्हा एकमेकांना पाहून आत्यानंद क्षणाक्षणाला वाटायला लागले.

तेव्हा तिघाचे एक मत झाले की आपण तिघेही आता येथेच राहून या आणि चातुर्मास या ठिकाणी काढूया. जेथे भक्त तेथे परमानंद उभा गोविंद ठाई ठाई साधू संत मुनी ऋषी 1 ईश्वराचे वंश भुमीशी लोकांना उपदेश करण्यासाठी 1 भवसागर तरण्यासाठी उपदेश करतात. पण एके दिवशी सेवादास महाराज यांची फिरायला जायची इच्छा होते. तेव्हा सेवादास म्हणाले, धर्मिसात व रामचंद्रसाताशी जलक्रिडेस जावूया. सौख्य भोगाया सारेजन तेव्हा सेवादास याचे सांगण्यावरुन तिघेही जन गंगातीरी गेले आणि तिघेही जण जल क्रिडा करुन लागले. तेव्हा सेवादास सांगायला लागले आता चला जावू छावणीला आज खूप श्रम झाले आहे देह मोकळा वाटायला लागला आहे. जलक्रिडा करावया धर्मिसाताची माळ गळ्यातील निघून गेली ते आठवत नव्हती. तिघेही कपडे नेसून लवकर परत आले. आणि आपल्या आसनावर जावून बसले तेव्हा सेवादास महाराज नोकराना हाक मारतात आणि सांगतात भूक आम्हाला लागली आहे. असे सांगल्यानंतर पाच पकवाणांची ताट भरुन आणली तेव्हा हे बघून धर्मिसाताच्या ध्यानात आले तेव्हा सांगतो स्वामी आज विपरीत घडले. गळा असे माणी कंठी माळ गेली बुडोनी जलाशयाशी ।

गळ्यात माळ असल्याशिवाय मला आज, अन्न, पाणी घेण्याची आज्ञा नाही. माझे प्राण जरी गेले तरी चालेल अगोदर माळेचा शोध लावूनच नंतर जेवन करेन मग सेवादास महाराज सांगतात, माळेसाठी हट्ट धरु नको. जन्मभराची सोबतीने तिही शेवटी आपल्याला सोडून जाते. त्या कायेला अग्नी लावून क्षणात भस्म होते सगळे. घेवून अनेक माळ टाका पुजा आटोपून कृत्यास माळ पाण्यात बुडाली आहे. तुम्हाला ती सापडणार नाही कष्टाचिया माळेसाठी, कष्टी जाहाले उगाची निरजन माळ, फिरते घरी तेव्हा त्याच जप रात्रविस करावा कष्टामाळ गळ्यात घालून । केव्हा घडत नाही मोक्ष साधन घांगरमाळ कंठी घालून बैल तरुन किती गेले. असे सेवादास महाराज धर्मिसातास सांगतो. ज्याचे हृदयी प्रमेश्वर ।

तोची तरुनी जाई भवपार काय, कर्म, कचाट, अवडबंर । आपले काम चांगले नसेल, तर कदापि नाही मोक्ष गंगेचे स्नान करुन । प्राणी जाते का उदरन्न पाण्यात जळू नित्य राहून कती वैकुंटाला गेले सांगा असे सेवादास महाराज सांगतात म्हणोनी ज्याचे हृदयी ध्यान, आहे तेच भरपूरी तरुन जावू शकतात. अन्य जे लोक भटकती व्यर्थ/आडराड त्यांना मोक्ष लाभत नाही । ज्याच्या हृदयी हरी आहे तेच भवपूरी जातात. ज्याचे चित्त सुद्धं नाही. त्याचे गंगास्नाने मोक्ष नाही. लाभत. भगवे कपडे अंगाला गुंडाळून मोक्ष मिळते का, नाही जाची स्थिर चित्तवृत्ती । सोंगनटाचे समस्ताही असे सेवादास धर्मिसातसा सांगतात आपले कुलदेवत चिती आठवा जर आपले दैवत आठवत नसेल तर त्यागोनी कर्म आचार म्हणूनी क्षणोक्षणी ध्यान करु चिती ज्याच्या सदा सर्वदा ईश चिंतन असे त्याला मोक्ष प्राप्ती होवे असे सेवादास महाराज सांगतात.

क्रमशः मोहन बापूराव राठोड चोंडीकर
मो. 9421768140

Leave a Reply