जनुना, उमरखेड, यवतमाळ रहवासी रविन्द्र राठोड बनला सर्वांत तरुण उपजिल्हाधिकारी

मुबंई : वडील गावठी दारू विकायचे.. दररोज दारू पिऊन मारायचे.. परिस्थिती हलाखीची.. वडिलांकडून सहारा नाही.. याच कठीण परिस्थितीने त्यातून बाहेर पडण्याची जिद्द दिली.. ठरविले, की मोठा अधिकारी बनायचे; पण शिकण्यासाठीही पैसे नव्हते. त्या वेळी मामांनी मदत केली.. पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरविले होते. दिवसात १६-१६ तास अभ्यास करायचो. शिकायलाही पैसे नाहीत; त्यामुळे क्लास लावण्याचा प्रश्नच नव्हता. पण जिद्द, चिकाटी, एकाग्रतेमुळे अवघ्या २२व्या वर्षी उपजिल्हाधिकारीपद मिळविले.. हे शब्द आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसरा आलेला व सर्वांत कमी वयात उपजिल्हाधिकारीपद मिळविलेल्या रवींद्र राठोडचे! एमपीएससीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. रवींद्रची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्याचे पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याची निवड केवळ उपजिल्हाधिकारी पदासाठीच नाही, तर मंत्रालयातील सहायक कक्षाधिकारी व विक्रीकर निरीक्षक म्हणूनही झाली आहे. रवींद्र यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जनुना या खेडेगावचा. घरची परिस्थिती हलाखीची. रवींद्रचे वडील गावठी दारू विकायचे. त्यामुळे दररोज दारू प्यायचे. मिळालेले पैसे घरी देत नसत. घरात खाण्यापिण्याचीही आबाळ. नशेत वडील रवींद्रला, आईला ते मारायचे. हा मार खाऊनही रवींद्र खचला नाही, तर त्यातून त्याला मोठा अधिकारी बनायची जिद्द मिळाली. त्याच्या या जिद्दीला आईने पाठबळ दिले. मग काय.. रवींद्रने शिकण्याचा चंगच बांधला; पण अडसर होता शिक्षणासाठी लागणार्‍या पैशांचा. या कठीण काळात त्याचे मामा निरंजन जाधव यांनी त्याला पैशांची मदत केली. त्यातून त्याने शिक्षणाचा गाडा पुढे ढकलला. शिक्षण घेत असताना त्याने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला; पण त्याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्याने माहिती घेण्यासाठी शोधाशोध सुरू केली. (पान १0 वर) जिंदगी एक हसीन आदत है! 
एक खूबसुरत चाहत हेै !
जो जिता है दिल से उसके लिये ये तो मोहब्बत है! 
जो जिता है मेहनत और लगन से उसके लिए तो यह जन्नत हे!
या शब्दांत रवींद्र राठोडने आपल्या यशाचे गमक ‘लोकमत’समोर मांडले. एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २0१५चा निकाल जाहीर झाला आहे. उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत अभिजित नाईक राज्यात प्रथम आले. रवींद्र राठोड यांनी द्वितीय, अतुल पंडित यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पोलीस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत राहुल धस यांनी प्रथम कमांक, तर मिलिंद शिंदे यांनी द्वितीय व कुणाल सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उपजिल्हाधिकारी परीक्षेत मुलींमध्ये सुहसिनी गोणेवार यांनी प्रथम, तर स्नेहा उबाळे यांनी द्वितीय व प्रियंका आंबेकरने तृतीय क्रमांक पटकावला. एमपीएससीचा निकाल जाहीर

चिफ एडीटर – गजानन डी. राठोड
बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल
वेब- www.goarbanjara.com
संपर्क -9619401377