चंदु चव्हाण यांचे दुःख निधन

किनवट (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजातील धडाडीचे कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जाणारे चंदु चव्हाण यांचे हृदय विकाराच्या झटक्यामुळे दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 53 वर्षे होते. त्यांच्यावर अंतिम संस्कार त्यांच्या मुळगावी जरुर तांडा येथे करण्यात आला. Chandu chavahnचंदु चव्हाण ह्यांच्या ह्या अशा अकस्मित मृत्युमुळे दलराम मेहरसिंग चव्हाण, कुवरसिंग चव्हाण, डॉ. मीनराम चव्हाण, अनुप चव्हाण, प्रा. पी.पी. चव्हाण, दिपक चव्हाण, ईश्वर चव्हाण ह्या चव्हाण कुटुंबियावर फार मोठे दुःख कोसळले आहे. चंदु चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन नांदेड शहरात वसंतराव नाईक साहेबांची पाटी स्थापन करुन वसंतराव नाईक चौक स्थापन केले आहे. अशा धाडसी कार्यकर्ता नांदेड जिल्ह्याने गमावला अशी प्रतिक्रिया संपादक गोविंदराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

Leave a Reply