घाटमाथ्यावर जातेगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी चारा छावण्यांसह वाड्यावस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरु करणेसाठी तहसिलदारांना निवेदन

श्री. सतिष एस राठोड ✍

नांदगाव :- नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगाव येथे चारा छावणी सुरु करणेसाठी येथील उपसरपंच नारायण पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटप्रमुख राजेंद्र लाठे यांनी नायब तहसीलदार एम.एस बैरागी यांना निवेदन दिले.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सन २०१७ च्या १९ व्या पशुगणने नुसार घाटमाथ्यावरील कूसुमतेल, ढेकु खु. व ढेकु बु. ,जातेगाव, वसंतगनर एक व दोन, चंदनपुरी, लोढरा, बोलठाण, गोंडेगाव, जवळकी आणि रोहिले येथे गाई व म्हशी ६४८१, शेळ्या व मेंढ्या३८८८,डुकरे ३७५, घोडे ३८, गाढव २९, कोंबडी ३५०० असे ऐकून पाळीव प्राण्यांची संख्या १४३११ असून २०१७ते २०१९ या दोन वर्षात वरील सर्व पाळीव प्राण्यांमध्ये १० % अतिरीक्त वाढ झालेली आहे.

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने घाटमाथ्यावर पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरी वरील गावातील पाळीव प्राण्यांची संख्या लक्षात घेता जातेगाव हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यात यावा असे म्हटले आहे. व सोबत ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत येथील पंधरा वाड्यावस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावे अशी सूचना सदस्य सुभाष पवार व किरण पाटील यांनी मांडली होती त्या मागणीस सर्वांनी मंजुरी दिली असल्याचा ठराव व जातेगावसह आकरा गावातील पाळीव प्राण्यांची २०१७मध्ये झालेल्या पशुगणना व त्यानंतर दोन वर्षात जनावरांमध्ये झालेली १० टक्के अतिरिक्त वाढ याबाबत तहसीलदार मनोज देशमुख यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता, तहसीलदार देशमुख यांनी नांदगाव तालुक्यात चारा छावण्या सुरू करणेसाठी तीन सेवाभावी संस्था पुढे आलेल्या असून येत्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल असे म्हणाले. यावर बोलठाण विकास सोसायटीचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी पशुधन मालकास प्रत्येक पशुधनामागे शंभर रुपये दररोज थेट बॅंक खात्यात अनुदान रक्कम जमा करावी अशी मागणी केली. यावेळी सरपंच जयश्री लाठे, कॉंग्रेसचे नेते नुतन कासलीवाल, अयुब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या निकशानुसार पाळीव प्राण्यांच्या गणनेचे प्रमाण खालीलप्रमाणे.

गाई, म्हशी,बैल,रेडा, घोडे,गाढव १×१=१

डुक्कर. १×५= ५

शेळ्या व मेंढ्या१×१०=१०

गावठी कोंबड्या १×१००=१००

वर दर्शविलेले प्रमाण हे शासकीय निकषानुसार आहे.