गोर बंजारा समाजातील साहित्याचे

गोर बंजारा समाजातील साहित्याचे लेखन कार्य ज्या-ज्या विचारवंतांनी केलेले आहे, त्या साहित्याचे वाचन केले असता, बंजारा (लमाणी) समाजाविषयी आपले विचार मांडावेअशी उत्कंठा मनात निर्माण झाली आणि सध्या चालत असलेले धनगर व बंजारा समाजाचे समायोजन (एस.टी.) आदिवासी समाजाच्या आरक्षणात केले जावे, अशी मागणी धनगर समाज प्रस्थापित राजकीय लोकांची कास धरुन करीत आहे. देशात मोदी यांचे सरकार 2014 मध्ये येण्यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती परंतू, तत्कालीन शासनासमोर बंजारा समाज नेहमी म्हणजे 1960 पासून आमचा आदिवासी समाजात समायोजन केला जावा या हेतूने पक्षातील अनेक दिग्ग्जामार्फत प्रयत्न करीत आहेत. परंतू त्यांनाकसल्याही स्वरुपाचे प्रोत्साहन तत्कालीन असलेल्या शासनाकडून या समाजास मिळाले नाही. यासाठी शासनाने रेनके सारखे आयोग नेमून आपली जबाबदारी धुडकावून टाकल्याचीप्रचीती आपणास आहेच. केंद्रात भारतीय जनता पार्टी यांचे शासन आल्याने महाराष्ट्रातील सत्तेवर असलेल्या काँग्रेसची धाबे दणाणली आहेत.आज तागायत काँग्रेसकडे कोणतेच असे अत्र नाही. ज्याच्या बळावर ते आपली सत्ता पुनःश्च काबिज करु शकतील. यासाठी त्यांनी धनगर व बंजारा समाजाचे समायोजन आदिवासी समाजात केले जावेत हा मुद्दा धरुन का असेना आम्ही अशा पद्धतीने समाजातील वेगवेगळ्या जातींचे प्रश्न लावून धरु व त्यांच्या माध्यमातून आम्ही आपली सत्ता पुन्हा काबीज करु अशी मनोवृत्ती समाजातील (राजकीय) जननेत्यांची झालीआहे. आज बंजारा समाज गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजात समायोजनासाठी आपला लढा देत आहे. परंतू, त्या समाजास अद्यापही कसल्याच प्रकारचा न्याय शासकीय स्तरावर मिळत नाही. यात केवळ सत्ताधारी राजकी नेते आपली भाकर भाजून घेऊन समाजातील भोळ्या भाबडय़ा लोकांची केवळ दिशाभूल करीत आहेत. वास्तविक पाहता बंजारासमाजाचा इतिहास हा क्रांतीकारी इतिहास म्हणून ओळखला जातो याची माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे.ब्रिटीशांच्या काळी बंजारा समाज क्रांतीकारी म्हणून ओळखला जात असे. तो आदिवासी जमातीत गणला जाई. मात्र, आदिवासींना मिळणार्या सवलतींसाठी हा समाज आजही पात्र समजला जात नाही. लंबाडी, सिंगाडी बंजारी, धेडोरी बंजारी, लमाणी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेला हा समाज भारतभर एकभाषा, एकसंस्कृती टिकवून आहे. गोरमाटी ही त्यांची भाषा. या भाषेलाही अद्याप राजमान्यता मिळालेली नाही. काही जमातींना ‘जन्मजात गुन्हेगार’ समजलं जावं. असा कायदा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांनी 1871 मध्ये केला होता. या कायद्यानुसार 198 जमाती गुन्हेगार ठरवल्या गेल्या होत्या. यात भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात असलेली बंजारा ही जमातही होती. ही जमात लंबाडी, सिंगाडी, बंजारी, धेडोरी बंजारी,लमाणी आदि नावांनी ओळखली जात होती. त्या काळात भारतात 5 हजार 500 राजे राज्य करत होते आणि या सर्व राजांना खाण्या-पिण्याच्या आणि कपडय़ालत्या संदर्भातल्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम या बंजारा समाजाकडे असे. ही जमात भारतातल्या राजेरजवाडय़ांना खारीक, खोबरं, मीठ, धान्य पुरवी. हजारो बैलांच्या पाठीवर हे साहित्य लादून या जमातीची भटकंती सुरु असे. त्या काळी दळणवळणासाठी आजच्या सारखे रसते नव्हते. जंगलातून, डोंगरातून, नदी-नाल्यांतून शेकडो-हजारो किलोमीटर प्रवास पायीच करावा लागे.बंजारा म्हणजे त्या काळचे मोठे व्यापारी म्हणा ना. राजेरजवाडय़ांना असं साहित्य पुरवणार्या या जमातीला ही रसद पुरवणं सोईचं जावं, यासाठी खास कायदा करण्यात आला होता. जिथं जिथं बंजारा समाजाचे तांडे व्यापारासाठी भारतात फिरतील, तिथं तिथं बंजारांच्या बैलांसाठी तीन घाट का पानी, ‘बैल का चारा’, मोफत दिला जावा, असा हा कायदा होता. त्यात कुणी अडथळा आणला, तर तीन खून माफ करण्याचं फर्मानही त्या काळीकाढण्यात आलं होतं, म्हणतात ! हे सर्व बंजारा लोक गोरेपान, उंचच उंच, धिप्पाड, डोक्याला मुंडास बांधलेले, खांद्यावर रुमाल टाकलेले, मिशांचे मोठमोठे आकडे असलेले असे असतं. त्यांच्याच पेहेरावामुळं ते उठून दिसत असत. त्यांना वाटेत लुटण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्यांनी केलेल्या प्रतिकारादाखल दोन-तीन लोक ठार झाले, तरी त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नसे, कारण, त्यांना त्या काळच्या राजांनी तशी मुभा दिलेली होती.बंजारा त्रीयाही गोर्यापान, नाकी डोळी निटास, अनेक प्रकारचे दागदागिने न्यायलेल्या, मनगटापासून ते दंडापर्यंत हस्तिदंताच्या पांढर्या बांगडय़ा घातलेल्या असायच्या. बाहेर गावी फिरताना आपलं सौंदर्य थेटपणे दिसू नये म्हणून शरीरावर व चेहर्यावर त्यागोंदवून घेत असतं. ही भोंदण खूप मोठी असत. केशभूषा करताना केसांना वेगवेगळ्या प्रकारचे आळेपिळे त्या देत.अशा केसांवर आरसे लावून त्यांवर सोन्या- चांदीचे दागिनेही त्या सजवत. केसाच्या वेण्या चेहर्यावर सोडून सारा चेहरा त्या झाकून घेत. या बंजारांची लमाणांची चालण्याची गती मोठी विलक्षण असे. वेगवान आणि झपाटय़ाची. त्यावरुन एक उक्तीही प्रचलित झाली होती. ‘लमाणी चालेले झपाटय़ाने आणि फुफाटा उडतो वहाणांनी’. बरोबर गडी माणं नसताना गुंडांनी या बायकांना अडवलं, तर सोबतच्या छोटय़ा- मोठय़ा शत्रांनीत्या स्वरक्षणार्थ वार करत असत. ही शत्र, त्यांनी त्यांच्यात केसात दडवून ठेवलेली असत. कुणी तलवारीच्या वार करु लागला तर तो वार त्या हातातल्या बांगडय़ांवर झेलत आणि प्रतिकारकरत. त्या काळी तलवारी, भाले, बर्चे ही शत्रं सर्रास वापरली जायची. वार झाला तर तो पगडीवर कसा झेलायचा यचं प्रशिक्षण पुरुषांना आणि हस्तिदंती बांगडय़ावर कसा झेलायचा, याचं प्रशिक्षण त्रियांना त्या काळी दिलं जाई, थोडक्यात, परिस्थितीनं या जमातीला लढाऊ बनवलं होतं. ही जमात क्रांतिकारी असल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. मोहंजोदडो संस्कृतीत कष्ट करणार्या बैलाला जसं पूजनीय स्थान होतं.तसंच स्थान बंजारा समाजातही बैलाला आहे. शिख पंथीयांनी मानवी मूल्यांवर सर्वात अधि भर दिल्याचं इतिहासात आढळतं. ‘कुठलही मूर्तिपूजा नको’, मानवता हाच खरा धर्म,देशभक्ती व देशाचं संरक्षण याला प्राधान्य आणि तेच खरं धर्मांच कर्तव्य अशी गुरु नानक यांची शिखधर्मियांना शिकवण होती. गुरु नानक यांची ही शिकवण प्रथम अमलात आणणारे बंजारा लोकच होते. म्हणूनच दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यांत मोठय़ा प्रमाणात शीखपंथीय बंजारा लोक दिसून येतात. उत्तरप्रदेश सारख्या राज्यात मुस्लीम धर्मीय बंजारा लोकही आढळून येतात.बंजारा समाजातही हिंदू, मुस्लिम, शीखधर्मिय असली तरी तिची बोलीभाषा भारतभर एकच आहे. ती म्हणजे गोरमाटी. इतर जमातींपेक्षा वेगळे संस्कार घेऊन जगणार्या सारख्याबंजारा जमातीची संस्कृती भारतभर एकच आहे. या जमातीची भटकंती भारतभर असे. बस्ती, बस्ती परबत परबत गाता जाए बंजारा, असे एक हिंदी सिनेगीत आहेच. बंजारा समाजात एक कर्ता पुरुष होऊन गेला. त्याचं नाव सेवालाल महाराज, त्यांनी भारतातल्या चार-पाच कोटी गोरबंजारा लोकांच प्रतिनिधीत्व केले आणि त्यांना दिक्षा दिली. सेवालाल महाराज या जमातीतला आणखी एक लढाऊ आणि कर्तृत्ववान पुरुष म्हणजे लखीशा बंजारा. साहित्य अस सांगत की, एकदा दिल्लीत विमुक्त घुमंतू आदिवासी लोकांची बैठक बोलावलीहोती. त्या बैठकीला लखीश बंजाराच्या पूर्वजांशी संबंध असलेले बरेच कार्यकर्ते आले होते.या बंजारांना दिल्लीमध्ये लंबाडी असे संबोधल्यास त्यांना आदिवासींच्या सवलती मिळतात आणि लमाणी बंजारा म्हटल्यास ते सवलतींपासून वंचित राहतात. आंध्र, कर्नाटकव दिल्ली इथं ही जमात आदिवासी ठरते, तर अन्य राज्यांमध्ये गुन्हेगार जमात असूनहीत्यांना जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवले जाते. महाराष्ट्रात यांची गणना ओबीसी आणि एन.टी. मध्ये केली जाते. 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला भारतातल्या आदिवासींच्या सांस्कृतिक जीवन किती महान आहे, ते दाखवण्यासाठी बंजारा लोकांच्या वेशभूषांच्या प्रदर्शन भरतं. नृत्य प्रकार दाखवणारे कार्यक्रम होतात. या जमातीच्या संस्कृतीचं असं केवळ प्रदर्शन भरतं, पण आदिवासींना मिळणार्या सवलतींपासून त्यांना वंचित ठेवल जातं.ही वस्तुस्थिती आहे. त्यांना राज्यघटनेत अधिकार देण्यात आलेला नाही. अखिल भारतीय बंजारा नावाची संघटना या जमातीसाठी कार्य करते. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष रणजित नाईक होते. मी लखी’शा बंजारा यांच्या क्रांतीची माहिती अगदी लक्ष देऊन वाचली. लकेखा बंजारांची मोठी वस्ती दिल्लीत मध्यवर्ती ठिकाणी कधीकाळी होती. लखेशा बंजारांची शौर्यगाथा वाचताना अंगावर शहारे येतात. त्यातली एक कहाणीअशी सांगितली जाते की, आपल्याला कुणी प्रतिकार करु नये, आपली जरब बसावी म्हणून ब्रिटीशांनी त्या काळी एका शीख क्रांतिकारकाचं शिर धडावेगळं करुन ते दिल्लीत भरचौकात टाकून दिलं होतं. या धडाला कुणी हाल लावला, तर त्याला देहदंडाची शिक्षा होईल. असंही ब्रिटीशांनी बजावल्यामुळं त्या मृतदेहाच्या आसपास कुणीही फिरकत नव्हतं. दोन दिवस तो मृतदेह चौकात तसाच पडून होता.त्यावेळी केवळ लखीशा बंजारा या क्रांतिकारकानं हिंमत दाखवली व त्या क्रांतिकारकाचा मृतदेह आपल्या बैलाच्या पाठीवर टाकून त्यान तो त्याच्या तांडय़ातल्या झोपडीत आणला आणि झोपडीला आग लावून देत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ही बातमी सर्वत्र पसरुन लखीशा बंजाराचं नाव प्रसिद्ध झाल. लखीशा बंजाराच्या या कर्तबगारीची उतराई म्हणून दिल्लीत शीख समाजानं त्याच्या नावान गुरुद्वाराची स्थापना केली. या बंजारा जमातीत स्वातंत्र्य पूर्व काळात आदिवासी म्हणून सोई सवलती होत्या. बैलांवर धान्यधुन्य, मीठ लादून येजा करणार्या या लोकांना पुढे बंजारा हे नाव देण्यात आलं. लाभण नदीवरुन मिठाच्या गोण्या करुन सार्या समाजाला हे मीठ या जमातीनं पुरवलं, पण या मिठाला भारतीय जागले काय, असा प्रश्न मला पडतो. या जमातीची एक भाषा, एक संस्कृती असूनही तिला एका वर्गाकरीता घेण्यात आलेले नाही. फाळणीच्या वेळी पाकिस्तानकडून इकडं आलेल्या 15-20 लाखसिंधीभाषकांच्या सिंधी भाषेला भारतात मान्यता मिळते.मात्र भारतात जिथं जिथं बंजारा जमता आहेत तिथं तिथं बोलल्या जाणार्या गोरमाटी भाषेला मात्र आजही साधी मान्यता मिळालेली नाही. आदिवासी असूनही आदिवासींच्या सोई सवलती मिळवण्यासाठी ही जमात पात्र नाही. वेगवेगळ्या राज्यांच्या क्षेत्रीय बंधनात अडकलेल्या या समाजाची स्वातंत्र्यानंतर आजही एकजूट होऊ शकलेली नाही. ती होऊ देण्यात आलेली नाही. हीच मोठी शोकांतिका नव्हे काय? तर मला हे समजत नाही की, आपला समाज प्राचीन काळापासून क्रांतिकारी राहत आलेला आहे. मग आजच्या युगात आपल्या बंजारा समाजाच्या अंगातील रक्त अन्यायाच्या विरोधात उसळून का उठत नाही?इतर जाती जमातीचे लोक एकत्र येऊन शासनावर दबाव टाकून आपल्या मागण्या पूर्ण करुनघेतात तर आपल्या समाजासही एकछत्राखाली येऊन शासनावर दबाव टाकून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यापलिकडे कोणतेच पर्याय उरलेले नाहीत. असे मला वाटते. गोर बंधुनो येत्या निवडणुकीत सेवालाल महाराजांनी बोललेले वाक्य लक्षात ठेवून मतदानाचा हक्क बजवावा ते म्हणजे ‘जानजो-छानजो-पचच मानजो’ जेने करुन येणार्या शासनाकडून आपल्या मागणीची पुर्तता करुन घेता येईल.जय गोर! जय बंजारा ! जय सेवालाल !