गोर-बंजारा समाजाची भगिनीचा बळी घेवून सुद्धा पोलिसांची दादागिरी

पुन्हा एकदा गोर-बंजारा समाजाची भगिनीचा बळी घेवून सुद्धा पोलिसांची दादागिरी……..
माझ्या आदरणीय तमाम देशातील बहुजन व गोर-बंजारा बांधवानो अजुन किती दिवस अन्याय,अत्याचार,छळवणुक,पिळवणुक निमुठपणे सहन करणार आहोत..जर असेच करत राहिलो तर एक दिवस हि वेळ आपल्यावर सुद्धा अल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगतो बंधुनो,”आता तरी जागे व्हा” लोकशाहीच्या राज्यामध्ये रक्षण करणारेच भक्षण करीत आहे ..!
दिनांक 23 जानेवारी 2018 रोजी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या मनमानी कारभार व अनाधिकृत बांधकामाच्या नावाखाली पिंपळे गुरव पुणे येथे गोर बंजारा समाजाच्या 30 वर्षीय देवीबाई पवार हिला त्यांच्या राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून अनाधिकृत कारवाई करायला आलेले पैकी दोन पोलिस महिला कर्मचारी व एक पोलिस पुरुष कर्मचारी याने वरून फेकून देवून तिचा खून केला आला आहे… इतका गंभीर स्वरूपचा गुन्हा असून देखील पोलिस तक्रार घेण्यास स्पष्ठपणे नकार देत आहे. उलट तुमच्यावरच फौजदारी स्वरूपचा गुन्हा दाखल करू असे झोन तीन चे DCP गणेश शिंदे यांनी वारंवार धमकी स्वरुपात दिली आहे.त्याबाबतचे अधिकृत पुरावा विडियो रिकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध आहे. एकीकडे खून आणि दुसरीकडे पिर्यादि सोबत असणाऱ्या सर्वावर गुन्हा दाखल करण्याची धमकी..? अशा स्वरूपाचे कृत्य पोलिस अधिकारीला शोभते का…
त्या निष्पाप माझ्या भगिनीचा खून करणारे खुनी माहित असताना देखिल पोलिस गुन्हा दाखल करुन घेतली नाही. एकीकडे निष्पाप जीव गेल्याचा दुःख तर दुसरीकडे पोलिसांची दादागिरी..! हे भारतीय राज्यघटनेला व लोकशाही राज्याला न शोभणारि घटना आहे…..!
सदारील घटनेला पिंपरी चिंचवड चे आयुक्त श्रवण हर्डीकर,झोन तीन चे डीसीपी गणेश शिंदे,एसीपी विक्रम पाटील,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे,पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे प्रशांत पाटील, डुम्बरे,म्हस्के,तायडे,वाघवंडे तसेच घटनास्थळी हजार असलेले त्या दिवसीचे सर्व अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार आहे….!
कायदा हातात घेवून निष्पाप बळी घेणाऱ्या वरील सर्व अधिकारी व कर्मचारी ह्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 354 व 120(बी)नुसार गुन्हा नोंदविण्यात यावे आणि तात्काळ वरील सर्व दोषीना सेवेतून निलंबित करण्यात यावे यासाठी सर्व स्तरातून मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेबांना तक्रार करावे ही कळकळीची विनंती,अशा व्यक्तिवर लवकरात लवकर कड़क कारवाई झालीच पाहिजे…सदर दोषीच्या विरोधात गुन्हा दाखल करावे म्हणून सलग दोन दिवस नगरसेवक दत्ताकाका साने साहेब,नगरसेवक राजेंद्र जगताप साहेब,युवराज दादा आड़े,नगरसेवक मारुती भापकर साहेब,नगरसेविका सोनकांबळे ताई,प्रो संदीप राठोड,छावाप्रमुख धनाजी पाटील,हिरा राठोड,मूर्ति राठोड,अमोल पवार,नंदू राठोड,शंकर राठोड,चंदर राठोड,आदेश राठोड,रमेश पवार तसेच बहुसंख्य बहुजन व गोर बंजारा बंधू भगिनी उपस्थित होते….!
यदाकदाचित संबधीत दोषिवर कड़क कारवाई करण्यात आली नाही तर निष्पाप बळी घेणाऱ्या तसेच पदाचा गैरवापर करणाऱ्या,धमकी देवून दादागिरी करणाऱ्या वरील सर्व दोषीच्या विरोधात उच्च न्यायलय मुंबई येथे WRIT दाखल करु या.. ह्या साठी आपल्या सर्व बांधवांची मला साथ,आशीर्वाद,प्रेम आणि मार्गदर्शन करावे हिच माफक अपेक्षा बाळगतो..आदरणीय सर्व माझ्या प्रिय बंधुनो पुरे झाले आता अन्याय अत्याचार अशा घमंडी प्रशासनाच..एकजूठीने लढा देवु व आपल्या भगिनीला न्याय देवु तरच तिच्या अत्म्याला शांती मिळेल ….जय हिंद ….जय सेवालाल
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

Tag : Adv. Ramesh Rathod, Banjara Live News