गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती आयोजित “१८मार्चचा महामोर्चा” यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

१) मोर्च्याला येणा-या प्रत्येक वाहनावर बंजारा समाजाचा पांढरा झेंडा व त्यावर लाल अक्षरामध्ये “जय सेवालाल” लिहिलेले असले पाहिजे.

२) आझाद मैदानला येण्याकरीता ईस्टर्न  फ्रि वे चा अथवा पुर्व द्रुतगति मार्गाचा वापर करावा.

३) ईस्टर्न फ्री वे करीता घाटकोपर किंवा चेंबूर वरून प्रवेश देण्यात आलेला आहे.

४) मोर्च्यामध्ये निदर्शनासाठी समाजाच्या मागणीचे बँनर्स सोबत आणावे.

५) मुंबईमध्ये प्रवेश करतांना पार्किगच्या कारणामूळे गाडी थांबवली तर जवळच्या रेल्वेस्टेशनला गाडी थांबवून सहभागी लोकांना उतरवून लोकल रेल्वेने आझाद मैदानला यावे.

६) मोर्च्यामध्ये सहभागी होतांना समाजबांधवांनी आपल्या शर्टाला मोर्चाचा बॅज (बिल्ला) लावावे.

७) मोर्च्याला येतांना पांढरा झेंडा व बिल्ला लावून आजाद मैदानात प्रवेश करावा.

८) “जय सेवालाल” चा जयघोष करत मोर्च्यात सहभागी व्हावे.

९) भाषण चालू असतांना मधे-मधे उठून मैदानबाहेर जावू नये.

१०) मोर्च्यात सहभागी होणा-या लोकांनी शिस्तीचे पालन करावे.

११) बंजारा समाज एक शिस्तप्रिय समाज आहे याची जाणिव ठेवावी व इतरांनाही करून द्यावी.

          🙏🙏   सेवार्थ  🙏🙏
———————————
भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था.

Leave a Reply