“गोर पान हे पुस्तक वाचता वाचता”

​गोर पान- वाचता..वाचता”

आदरनीय,

भीमणीपुत्र मोटोबापू,

मोहन नाईक

————————————

✍ प्रा.दिनेश सेवा राठोड

कोहळा तांडा, ता.दारव्हा

जि.यवतमाळ(महा.रा.)

????  *9822703612*

आपण शब्द सैनिकांच्या फौजचे  खरे शिलेदार आहात.. अशा फौजमध्ये माझ्या सारख्या ओशाळलेल्या  मलोबल खचलेल्या मृतवत सैनास  तुमच्या  तुकडीत स्थान देनं…! एक मोठ भाग्यच…लाभत….!

आपल्या   साहित्यात  गोर गणाच्या आस्था व अस्तित्वाच  मार्मिक वा  वस्तुस्थिती,वस्तुनिष्ठता,सत्यता आणि काही प्रकारात पडताळणी, समसमीक्षण आणि मूल्यांकन अभिप्रेत वैशिष्ट्यांनी व निष्ठेंनी मी भारावून गेलोय…

*गोर पान* वाचता वाचता अनुवादाच्या कक्षेतील  विस्ताराने विवेचन करताना लक्षात आल की, तुमच्या   साहित्य कृतीतील तांडामय वास्तववाद म्हणजे व्यक्ती, प्रसंग, वस्तू, घटिते आदींचे-म्हणजेच जीवनाचे यथातथ्य आविष्करणाच  खर दर्शन  होतय. एवढंच काय, तुमच्या  विस्तारित वास्तववादी साहित्यात वास्तवाचे व्यक्तिनिरपेक्ष, अनुभवपूर्ण अस्तित्व मान्य केलेले तांडामय खर चित्र दिसत… हे वास्तव साहित्यकृतीच्या विषयवस्तू, तंत्र आणि तुमची तात्त्विक भूमिका या घटकांमधून साकार होत जाताना पाहायला मिळत.

हे कल्पनारम्य विषय तर मुळीच नाही तर  सर्वसामान्य तांड्यामय गोर गण जीवनातील नित्याचे, जिव्हाळ्याचे, संस्कृतीच्या बंधाचे अनुभवही साहित्याच्या घट्ट विषयवस्तू  झालेल्या आहेत. गोर गणाच्या धाटीचे अनुभवविश्व सूक्ष्मपणे आपण  टिपून काढलय.. म्हणजे तुम्ही तांडामय वास्तववादाला कोणताच मानवी अनुभव वर्ज्य नसल्याने आर्थिक-सामाजिक व्यवस्था, समाजाची मानसिक घडण व अनुभवसंपन्न विश्व  हे सारे गोर पान विषयवस्तूंमध्ये समाविष्ट आहे.  तुम्ही ‘साहित्य उपरिनिर्दिष्ट वास्तवाला यथातथ्यपणे येथे साकार केलेले आहे.   जसे टॉलस्टॉय व गॉर्कीनी विचारात मांडलेला  वास्तववादी सिद्धांतिक  दृष्टिकोन  प्रतिबिंबित केल … नेमक तसच….! बापू.. ,आपण जाणता, राम गणेश गडकरी या नावाचा उल्लेख ‘मराठी शेक्सपिअर’असा केला जातो. *आम्ही एक वेळ इंग्लंड देऊ, पण शेक्सपिअर देणार नाही* या इंग्रजांच्या विधानातील गांभीर्य येथे तुमच्या बाबतीत लागू पडतो.. तुम्ही  इंग्रजी बाणा नसला तरी अस्सल गोर बाणा  आहात. *म्हणून आपण गोर बंजारा साहित्य क्षेत्रातील  गडकरीच नव्हे तर  शेक्सपियर मात्र  निश्चितच आहात (अतिशयोक्ती नव्हे)*

आपणास ऊदंड आयुष्य लाभो.

आपला,

〰〰〰〰〰〰

सौजन्य: गोर कैलास डी राठोड

Tag: Banjara Live News

Leave a Reply