केंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड

केंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड

नागपूर :- वंजारी सेवा संघ विदर्भ नगपूर जिल्हा अायोजित *”विदर्भ विभाग स्तरीय पदाधिकारी बैठक,मुक्त चर्चा,मार्गदर्शन शिबीर तथा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती सोहळा”* सकाळी ९- सायं. ४ वा. पर्यंत *कान्फरन्स हाॅल,स्व.शंकररावजी बडे बैठक स्थळ,अामदार निवास,सिव्हिल लाईन्स,नागपूर* येथे
वंजारी सेवा संघाचे *प्रदेश अध्यक्ष मा.श्री.अनिल फड* यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात संपन्न झाला.
तीन सत्रामाध्ये बैठकिचे नियोजन करण्यात अाले होते.पहिल्या सत्रामध्ये बैठकिचे उद्घाटन तथा सर्व पदाधिकारी परिचय अाणि त्यांचे मनोगत ठेवण्यात अाले होते.या बैठकीचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अंकुशजी केदार साहेब अाणि तहसिलदार मा.श्री.रामकिशनजी डिघोळे साहेब यांच्या हस्ते करण्यात अाले.अतिशय अनमोल असे मार्गदर्शन मा.श्री.केदार साहेब अाणि मा.श्री.डिघोळे साहेब यांनी केले.
दुसर्‍या सत्रामध्ये कार्यसमिती बैठक घेण्यात अाली अाणि विविध विषयावर मुक्त चर्चा करण्यात अाली.तिसरे सत्र हे मान्यवर मार्गदर्शन अाणि पदाधिकारी नियुक्ती तथा *”लोकनेता दिनदर्शिका-२०१९”* सोहळा असे होते.
बैठकिचे सुत्रसंचालन नवनियुक्त विदर्भ सरचिटणीस प्रा.श्री.विनोदजी खेडकर सर यांनी केले तर अाभार जिल्हाध्यक्ष प्रा.डाॅ.चंद्रशेखर गिते यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम नागपुर सारख्या ऐतिहासिक शहरात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री.सुरजजी चाटे,सौ.निशाताई मुंडे,श्री.नामदेवजी केंद्रे यांच्यासहित सर्वच पदाधिकारी यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम व मनंपूर्वक धन्यवाद.

*????????भटके विमुक्त व ओबीसी चळवळीमध्ये कार्य करणारी समाजातील एकमेव संघटना—*

याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.अनिलजी फड यांनी
त्यांच्या बिज भाषणात गेल्या चार वर्षांपासून आपण सर्वांच्या अथक परिश्रमातून वंजारी सेवा संघाचे कार्य विस्तारीत होत गेले अाहे.अाज राज्यात सर्वात प्रभावी,अभ्यासु अाणि वैचारीक व बौध्दिक पाळीवरील संघटन म्हणून अापल्याकडे पाहिले जात अाहे.वंजारी सेवा संघ(असो.) ही सामाजिक संघटना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना भटके-विमुक्त व ओबीसी च्या चळवळीत सक्रिय पणे काम करीत आहे. वंजारी समाजातील हि ऐकमेव संघटना अाहे जी राज्यात भटके विमुक्त व ओबीसी चळवळीत सक्रियपने कार्य करित अाहे.केंद्रिय भटके विमुक्त अायोगासोबत तीन वर्ष कारणारी,समाजाचे प्रश्न अायोगाच्या समोर मांडणारी वंजारी सेवा संघ हि राज्यातील एकमेव संघटना अाहे.भविष्यात केंद्रिय अायोगाच्या शिफारसी लागू झाल्या तर वंजारी समाजाच्या होणार्‍या कल्याणामध्ये वंजारी सेवा संघाचा सिंहाचा वाटा असेल.वंजारी समाजातील अाध्यात्मिक,राजकिय व सामाजिक महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारी हि ऐकमेव संघटना अाहे.राज्यातील सर्वात प्रभावी महिलांचे व युवकांचे संघटन हे वंजारी सेवा संघात आहे.दिवसेंदिवस सेवा संघाचे कार्य जोमाने सुरु असून यापुढेही आपल्या सर्वांच्या अनमोल अश्या सहकार्याने कार्याची व्याप्ती वाढत जाईल असे सांगितले.

*संघटनेत व्यक्तीपुजा दुर ठेवली पाहिजे.समाजाची सेवा हेच अापले अंतिम ध्येय असले पाहिजे.समाजासाठी सदैव जणजागृती करणे,ज्ञानदानाचे कार्य करणे अाणि समाजात घुसू पाहणार्‍या अवैचारिक अपप्रवृत्तींना व शक्तिना रोकने हि अापली नैतिक जबाबदारी अाहे याचे कायम अापल्याला स्मरण असले पाहिजे.हे एक निरंतर चालणारी कार्य प्रक्रिया अाहे. कार्यकर्त्यांची वाढ अाणि विकास कधिच थांबत नाही.एका दिवसात,वर्षात हे शक्य नाही.अापल्या कित्येक पिढ्या यासाठी खर्ची पडतील.इथे कोणिही कायमचा पदाधिकारी राहणार नाही.ज्याच्याकडे हा वैचारिक रथ पुढे घेऊन जाण्याची क्षमता असेल तो इथे नेतृत्व करेल अाणि सेवा संघ हा समाजाचा व प्रत्येक घटकाचा अाहे.*

*” एक दिन मे सागर निर्माण नही होता। बूंद बूंद करके ही नदी बनती है।।*
*समय सदा गतिशील है ।पल-पल करके हि एक सदी बनती है।।*

*????????साहित्यनिर्मिती,सवंर्धन व समस्यावर लिखाणाची गरज—*

विमुक्त जाती या खर्‍या अर्थाने या देशाचे अाद्य क्रांतिकारक अाहेत.तर भटक्या जमाती या देशाच्या संस्कृती,रुढी,परंपरा,लोककला,धर्माच्या रक्षक अाहेत.परंतू या देशातील व्यवस्थेने विमूक्तांना गुन्हेगार अाणि रक्षकांना भिकारी असा शिक्का त्यांच्या माथी मारला.अापला खरा इतिहास अाणि योगदान समोरच अाले नाही.
भटके विमुक्त प्रवर्गातील कित्येक जाती जमाती,कला,बोलीभाषा,संस्कृती,परंपरा व इतिहास अाज नष्ठ होण्याच्या मार्गावर अाहे.अनेक वर्ष गरिबी व अन्याय सहन करत अालेला हा समाज अाज धर्मांतराची शिकार होताना दिसत अाहे.त्यामुळे अाता अापल्याला अापल्या संस्कृतीविषयी,महापुरुषाविषयी,इतिहासाविषयी,योगदानाविषयी लिहावे लागेल.अापली धार्मिक परंपरा,लोककला,लोकसाहित्य पुर्नंजिवीत करावे लागेल.माध्यमांना अापल्या समस्येविषयी कसलेही स्वारस्य नाही.याचा विचार अापण केला पाहिजे.अापल्यातील प्रतिभावंतानी,साहित्यकारांनी,पत्रकारांनी या समाजाच्या समस्येविषयी लिहावे लागेल अाणि त्याला प्रसिध्दी द्यावी लागेल.शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करावा लागेल.

*????????अभ्यासक्रमासाठी बंजारा समाजाच्या “गोरमाटी” भाषेचा व साहित्याचा समावेश करावा—*
अाज अामचा बांधव असलेल्या बंजारा समाजाची असलेली बोलीभाषा “गोरमाटी” अाज लुप्त होताना दिसत अाहे.पाली भाषे प्रमाणेच अभ्यासक्रमात गोरमाटी भाषा व साहित्य यायला पाहिजे.देशभर ऐकच भाषा बंजारा समाजात वापरली जाते.कित्येक शतकांची परंपरा या भाषेला अाहे.बंजारा समाजाला लोककला,लोकपरंपरा व लोकसाहित्याचा मोठा इतिहास व वारसा अाहे.याचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने या साठी पुढाकार घ्यावा अाणि बंजारा समाजातील संस्था अाणि संघटना यांनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत यासाठी अाम्ही सदैव अामच्या मोठ्या भावासोबत लढ्यासाठी तयार अाहोत.

*????????केंद्र सरकारने तात्काळ इदाते अायोगाची अमलबजावणी करावी—वंजारी सेवा संघाची भूमिका*

अनेक शतकानुशतके अतिशय हिन अायुष्य जगणारा,कित्येक परिकीय अाक्रमनांपासुन या देशाचे संरक्षण करणारा अाणि देशाला स्वातंत्र्य मिळून सुध्दा ७२ वर्षापासून अद्याप संविधानिक न्याय व हक्काच्या प्रतिक्षेत असलेल्या विमुक्त भटक्या जाती जमातीसाठी अाजपर्यंत सरकारने बरेच अायोग नेमले परंतू कोणत्याही अायोगाची अमलबजावणी केली नाही.पहिल्यांदाच अापले अख्खे अायुष्य भटके विमुक्तांसाठी समर्पित करणार्‍या ॠषीतुल्य अशा कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने जानेवारी २०१५ मध्य अायोगाचे गठन केले अाणि अादरणिय दादा इदाते यांनी संबंध देशभर फिरुन,सर्वांगीन अभ्यास करुन अतिशय कल्याणकारी अशा शिफारसी सादर जानेवारी २०१८ मध्ये केल्या अाहेत.जवळपास १६५८ जाती जमाती अाणि १५ करोड लोकसंख्या समोर अाली अाहे.सामाजिक,राजकिय व शैक्षणिक दृष्ट्या प्रचंड मागासलेपनं या समाजात अाहे या टिप्पणीसहित निती अायोगाने या अायोगाच्या अहवालाला मान्यता दिली अाहे.सरकार हि सकारत्मक अाहे पनं अमलबजावणी तात्काळ केली पाहीजे.अाता अाम्हाला दुसरा अायोग नको अाहे.इदाते अायोग हा शेवटचा अायोग ठरावी हि अामची या सरकारला नम्र विनंती अाहे.अाज अायोगाविषयी वंजारी समाजात जनजागृती सेवा संघ हि ऐकमेव संघटना करित अाहे अाता समाजातील सर्व संस्थांनी,संघटनांनी,लोकप्रतिनिधी यांनी सहभागी झाले पाहीजे व पुढाकार घेतला पाहीजे असे अावाहन श्री.अनिल फड यांनी केले.सध्या राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदने व पत्रे लिहने चालू अाहे.याची व्याप्ती वाढवली जाईल व प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे अांदोलन करण्यात येईल याची घोषणा करण्यात अाली.

*????????अापलाच????????*
*श्री.साहेबराव धात्रक(पत्रकार दै.पुण्यनगरी)*
*प्रसिध्दी प्रमुख*
*वंजारी सेवा संघ(असो.)विदर्भ विभाग*