“कृती संशोधनाच्या निष्कर्षाअंती”

पेज क्र.2.. वरून पुढे,..
वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य
       🌺 कृतीसंशोधानाच्या निष्कर्षाअंती,  लग्नाच्या दिवसी लग्नमंडपातील माझे प्रबोधनात्म मार्गदर्शन  अत्यत उपदेशक असल्याची कबुली गावकरी मंडळींनी व्यक्त केली त्याचा प्रत्यय मला आला.समस्त पंचक्रोशितील पाहुणे मंडळीची बहुसंख्येनी उपस्थिती लाभली.
    वधु व वर मंडळींनी वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन चळवळीच्या  मी व माझ्या समस्त संघटक मंडळीचा मान ठेवत वर वधू पक्षानी  ,बंजारा  समाजात एक नविन आदर्शवाचा धडा समाजासमोर मांडला. व समाजात नवचैतन्य आल्याचा आनंद आमच्या  चळवळीत फुलला.
🌺कृतीसंशोधनाचे निष्कर्षाअंती मिळालेले प्रत्यक्ष फलित …..
     1)विवाह खर्चात जाणिवपूर्वक  कपात केल्यामुळे हुंडा न घेता लग्न पार पडले.
  2) लग्न हा बँड व डि.जे विरहित लागला.
  3) पंगतीत मिष्ठांन्न वगळता साधे गावजेवनाला पसंती.
  4)  बंजारा बोलीतील लोकगीतांचा जागर त्यामुळे संस्कृती संवर्धनला दिशा मिळाली.
  5) गोरवट जुन्या पद्धतीने लग्न आटोपला.
  6) मद्यपान नसल्यामुळे भांडनाला कोणतेही वाव नव्हते.
  7) उपरोक्त बाबी अमलात आल्यामुळे लग्न बरोबर वेळेवर पार पडले.व उपस्थित सर्वांना सोईस्कर ठरले.
8) विवाह खर्चात कपात करून उरलेल्या पैशाचा सदुपयोग येत्या हंगामात पेरणीसाठी करता येईल . त्यामुळे सावकाराकडे जावे लागनार नाही .कर्जबाजारी रोखता येईल, पर्यायाने शेतकरी आत्महत्या सुद्धा करणार नाही. अशी प्रतिक्रिया बहुतेकांनी मांडण्याचा मोह आवरता आला नाही. 
🌺सहकार्य……
  1)मनोज नाईक प्रा.शिक्षक.खडकी, प्रकाश राठोड,गुलाब पवार उपसरपंच,
प्रशांत राठोड,ज्योतिराम राठोड,फुलसिंग चव्हाण
(सर्व मोहेगाव)
जितु नाईक ,राजु राठोड,विठ्ठल नाईक.निलय नाईक (प..स.उपसभापती जामनेर)
व प्रश्नावली सोडविनारे तथा मुलाखातीत समाविष्ट गणमान्य दोन्ही तांड्यातील वरिष्ठ मंडळी. 
                                      🌺मार्गदर्शन..वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन समस्त संघटक,
  * पंडित राठोड.* सेवालाल  राठोड, *गोर कैलास डी.राठोड,* प्रा.संतोष राठोड. (सर्व मुंबई )
  * प्रा.रवींद्र राठोड नागपूर
🌾सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या या सर्व गोर बांधवांचा आभारी आहे. त्यामुळेच या उपक्रमाला यश आले,………..    
  🌺माझ्या गोर बंजारा  मित्रांनो, विषय अत्यत गहन आहे. वेळवर सावध झालो नाही तर समाजाचे आर्थिक शोषण थांबनार नाही. सदर कृती संशोधनाचे प्रत्यक्ष उपयोजन करताना मोठी मेहनत घ्यावी लागली. अपेक्षा आहे, आपण सुद्धा असी मोहीम चळवळ राबवाल. हे काम दुसऱ्या कोणाचे नसून आपल्या सारखे सुशिक्षित नौकरी करणाऱ्या मंडळींची आहे.
  🌺चला आमच्या या  चळवळीसोबत या व समाज ऋण फेडण्याचे मानकरी बना .
🌾परत भेटू या आणखी एक नविन उपक्रमासह……
आपलाच ………
✍प्रा.दिनेश एस.राठोड
     9404372756                       संघटक – वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ तथा,कार्यकर्ता-अॉल इंडिया बंजारा सेवासंघ.
गाव -कोहळा तांडा जि.यवतमाळ
हमु.मलकापुर जि.बुलडाणा
जय सेवालाल * जय वसंतराव नायक,
🍀कार्यक्रम सबंधीत फोटो

सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
संघटक वसंतरावजी नायक (कृती) चळवळ समिती महाराष्ट्र राज्य,
ऐडीटर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
websites:www.goarbanjara.com

image

Posted from WordPress for Android

Leave a Reply