औरंगाबाद मराठवाडा मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रा. मोतीराज राठोड यांचा सत्कार

Prof. Motiraj Rathod
औरंगाबाद (प्रतिनिधी) : साहित्य अकादमी भारत सरकार तर्फे 2014 वर्षाचा राष्ट्रीय भाषा सन्मान प्रा. मोतीराज राठोड यांना मिळाला. त्याकरिता त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सत्कार दि. 20-12- 2014 रोजी ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे सर यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता साहित्य परिषदेमध्ये देण्यात आला आहे. यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. मोतीराज राठोड यांच्या साहित्य आणि चळवळीबद्दल विचार व्यक्त करताना राष्ट्रीय भाषा सन्मान मिळविणारे बंजारा समाजाचे एकमेव साहित्यकार असून बंजारा, लंबाडी भाषेला त्यांनी साहित्य अकादमी दिल्लीची मान्यता मिळवून दिली आहे. पुरस्काराचे रोख एक लाख रुपये आणि ताम्रपट असे स्वरुप होते. मराठवाडय़ातील बंजारा समाजाला सर्व प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच सार्वजनिक सपत्नीक सत्कार करण्यात आला अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. कौतुकराव टाले पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Leave a Reply