उद्या दि. ८ मार्च रोजी बोढरे, शिवापूर शिवारातील सोलर पिडीत शेतकर्यांचे धरणे आंदोलन

श्री. सतिष एस राठोड ✍

चाळीसगांव :- लोकशाही मार्गाने न्याय न मिळाल्यास आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणुकांवर बहीष्कार व राजकीय नेत्यांना गावबंदी असा इशारा देण्यात येणार आहे.

  • ९० % बंजारा समाजसह ,दलित मागासवर्गीय भटक्या विमुक्त वंचित समाजाची जमिन सोलर कंपन्यांनी राजकीय आश्रयाखाली गैरमार्गाने स्वस्तात जमिनी बळकावल्या आहे, त्या विरोधात गेल्या दोन वर्षापासून शासन दरबारी लढा चालू आहे.

महसुल राज्य मंत्री संजय भाऊ राठोड यांनी गंभीर दखल घेऊण चौकशीचे आदेश दिले आहे परंतू प्रशासन चौकशी अहवाल पाठविण्यास विलंब लावत आहे, वेळीच चौकशी अहवाल पाठवून त्या आधारे न्याय न मिळाल्यास येत्या निवडणुकांवर बहीष्कार टाकून राजकीय नेत्यांना गावबंधी असा ईशारा देण्यात येणार आहे.

  • तरी या धरणे आंदोलनास सामाजिक बांधिलकी दृष्टीकोनातून पिडीत शेतकर्यांच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती पिडीत शेतकर्यांच्या वतीने भिमराव जाधव शेतकरी बचाव कृती समिती चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply