उद्या ७ ऑक्टोबर रोजी ‘तळेगांव (तांडा),ता.चाळीसगांव’ येथे बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन

श्री. सतिष एस राठोड ( बंजारा लाईव्ह )

चाळीसगांव :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेतर्फे तळेगांव(तांडा), ता.चाळीसगांव” येथे दि.०७/१०/२०१८ (रविवार) रोजी संध्याकाळी- ०५:०० वाजता “भव्य तालुकास्तरीय बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वप्रथम “चाळीसगांव शहर, करगांव (तांडा) नं. १,२ आणि तळेगांव (तांडा)” येथे ‘राष्ट्रीय बंजारा टायगर्स” या संघटनेचे ‘शाखा फलक अनावरण समारंभ होऊन संध्याकाळी ०५:०० वाजता. तळेगांव (तांडा) येथे भव्य बंजारा समाज मेळावा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्माराभाऊ जाधव, प्रदेशाध्यक्ष-अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख अतिथी-मा.मदनभाऊ जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष), मा.वाल्मीकभाऊ पवार (राष्ट्रीय महासचिव),मा.अनिलभाऊ पवार (राष्ट्रीय सरचिटणीस),मा.मुरलीभाऊ चव्हाण (राष्ट्रीय संघटक),मा.ॲड.अविनाशजी जाधव (राष्ट्रीय प्रवक्ता),मा.राजेशजी नाईक (राष्ट्रीय कोषाध्यक्ष),मा.डॉ.सौ.सुजाताताई आडे (प्रदेशाध्यक्ष-महिला आघाडी),मा.भारतभाऊ राठोड (प्रदेशाध्यक्ष-विद्यार्थी आघाडी), मा.जगदिशभाऊ राठोड(प्रदेश संघटक),मा.राजुभाई राठोड(नाशिक जिल्हाध्यक्ष),मा.नरेंद्र राठोड (जि.उपाध्यक्ष),मा.अनिल नाईक (जिल्हा संघटक),मा.सिताराम पवार (जिल्हा सरचिटणीस),मा.दयाराम तंवर (जळगांव महानगराध्यक्ष),मा.केवलसिंग तंवर (कल्याण तालुका सचिव),मा.ईश्वर राठोड(जि.सह-संघटक),मा.भरत पवार (जिल्हा सचिव),मा.सरीचंद चव्हाण (तालुकाध्यक्ष),इ.मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी चाळीसगांव तालुक्यातील सर्व बंजारा समाजबांधवांनी या “बंजारा समाज मेळाव्याला” उपस्थित रहावे. असे आवाहन चाळीसगांव तालुकाध्यक्ष मा.सरीचंद चव्हाण,तळेगांव शाखाध्यक्ष-सुनिल राठोड,उपाध्यक्ष- अरविंद चव्हाण,सचिव-समाधान चव्हाण,मा.गोवर्धन राठोड (मा.सरपंच) यांच्यासह सर्व तळेगांववासीय बंजारा बांधवानी केले आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

मा.सरीचंद चव्हाण
(तालुकाध्यक्ष)
राष्ट्रीय बंजारा टायगर्स
चाळीसगांव तालुका
संपर्क- 9623929516

One Comment
  1. Avatar

Leave a Reply