उद्या विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद, मुंबई विभागीय कार्यकरिणी तथा सन्मान सोहळा

????????सस्नेह निमंत्रण????????

  • विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद(रजि.अखिल भारतीय) मुंबई विभागीय कार्यकरिणी तथा विभागातील राज्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक तथा सन्मान सोहळा.

——————————————

मुंबई:- देशभरातील भटक्या-विमुक्त समाजाकरिता कार्य करीत असलेल्या विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद मुंबई कार्यकारिणीची तथा मुबई-ठाणे-नवी मुंबई परिसरातील राज्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक तथा सन्मान सोहळा शनिवार दिनांक ०९/०२/२०१९ रोजी दु. ३:३० वा.संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष कर्मवीर मा. दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली अायोजित करण्यात अाला अाहे.

  • संघटनेचा या परिसरातील संघटनात्मक कार्य अाढावा, संघटन बांधणी, सरकार पातळीवरील झालेले निर्णय, संघटनेची जबाबदारी,संघटनेचा विस्तार, कार्य करण्यासाठी इच्छूकांना नियुक्ती, पुढील कार्याची दिशा ई.विषयावर या बैठकिमध्ये चर्चा होणार अाहे. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा संपन्न होणार अाहे.

-: मान्यवर उपस्थिती :-

या कार्यक्रमासाठी खा.गोपाळजी शेट्टी साहेब,
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष बंजारारत्न मा.श्री.किसनभाऊ राठोड, महासचिव मा.श्री.सुभाषजी राठोड,गवळी समाजाचे जेष्ठ नेते मा.श्री.शंकरशेठ माटे,भाजपा (भ.वि. अाघाडी) प्रदेश अध्यक्ष तथा गोसावी समाजाचे नेते मा.श्री.योगेशजी बन,विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्यवाह श्री.राजेंद्रजी वनारसे, राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.कांचनताई खाडे,राज्य अध्यक्ष श्री.दिलिप धोत्रे अाणि राज्य कार्यवाह श्री.अनिल फड यांच्यासहित विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभनार अाहे.

संघटनेच्या राज्य व मुंबई कार्यकरणीच्या वतिने सन्मान

  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच केंद्रिय अर्थसंकल्पामध्ये भटके विमुक्तांच्या उथ्यानासाठी अतिशय महत्वपुर्ण पाऊल पडले अाहे.गेली ४० वर्षे भटके विमुक्त समाजासाठी निस्वार्थ कार्य करणारे ॠषीतुल्य कर्मवीर दादा इदाते यांच्या कार्याला ऐतिहासिक असे यश येत अाहे.पहिल्यांदाच संसदेमध्ये अायोग लागू करण्याचा व अर्थसंकल्पात तरतुद करण्याचा विषयाला मंजुरी मिळाली अाहे.गृहमंत्रालयाने गुन्हेगारी कायदा रद्द करण्याचा अाणि कायमस्वरुपी अायोग स्थापन करण्याचा विषय हाती घेतला अाहे.यासाठी संघटनेच्या वतिने अादरणिय दादा यांचा सन्मान करण्यात येणार अाहे.
  • वडार समाजाचे लढवय्ये व सक्षम असे नेतृत्व ना. विजयजी चौगुले साहेब यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतिने त्यांचा सन्मान करण्यात येणार अाहे.

मुक्त चर्चा व मार्गदर्शन

  • उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत मुक्त चर्चा व सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन होणार अाहे.
  • तरी मुंबई-ठाणे-नवी मुंबई परिसरातील सर्व सक्रिय कार्यकर्ते,पदाधिकारी,ज्यांना अादरणिय कर्मवीर दादा इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची इच्छा अाहे अशा सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे हि नम्र विनंती अाहे.

????दिनांक व वेळ????
शनिवार दि.९ फेब्रुवारी २०१९
दु.३:३० वा.

????स्थळ????

  • विमुक्त-घुमंतू जनजाती विकास परिषद(रजि.) केंद्रिय कार्यालय,स्व.शैलजा विजय गिरकर समरसता सभागृह,राजर्षी शाहु महाराज संस्कार केंद्र, फुलपाखरु उद्यान, मागाठाणे डेपो समोर, बोरीवली(पुर्व), मुंबई-४०००६६.

????????आपले विनित????????

श्री.सहदेव रसाळ(मुंबई अध्यक्ष)
श्री.मंगेश शिंगे(उपाध्यक्ष)
श्री.गिरीधर साळुंके(कार्यवाह)
श्री.श्रीकुमार शिंदे(कोषाध्यक्ष)
तथा समस्त पदाधिकारी व सदस्य मुंबई विभाग

Leave a Reply