उद्या बंजारा एकता परिषदेच्या वतीने पाचोरा येथे बैठकीचे आयोजन

बंजारा समाजाला एकजूट होण्याचे आव्हान

श्री. सतिष एस राठोड ✍

  • कल्याण :- दि. ०३/०३/२०१९ रविवार रोजी पाचोरा येथे खान्देश विभाग तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, मुंबई , पुणे , मध्ये प्रदेश , खंडवा , ब्रहाणपुर, बडवाणी, धार, इंदौर येथील सर्व बंजारा समाजप्रेमी तसेच तन मन धनाने समाजासाठी झटणारे चळवळीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते. समाजाचे भविष्य असणारे तरुण मित्रांना, व माता बघीनींनी आपण आपला बहुमुल्य वेळात वेळ काढून समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय , शैक्षणिक, सांस्कृतिक भवीतव्यासाठी व दिशाहीन भोळ्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी वैचारिक, चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस सर्व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ,कार्यकर्ते , राजकीय नेते, आजी माजी आमदार खासदार ,मा. ना.मंत्री महोदय आणि पदाधिकारी , नायक, कारभारी, सरपंच, सदस्य,पं स ,जि प सदस्य, चेअरमन, शासकीय अधिकारी कर्मचारी , वकील, डॉक्टर , समाजसेवक, प्रबोधनकार , शेतकरी ,कष्टकरी , ऊसतोड कामगार, नाका कामगार, व्यापारी , जेष्ठ नागरिक बुद्धीजीवी वर्ग अशा सर्व समाज प्रेमींना आमंत्रित करत आहे.
  • सदर बैठकीस सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक जिजाताई राठोड (पाचोरा) यांनी बंजारा एकता परिषदेच्या वतीने केले आहे.

♦♦ ठिकाण ♦♦

नवजीवन विद्यालय नवकार प्लाझाच्या मागे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, भडगाव रोड पाचोरा.
वेळ :- दुपारी १ :०० वाजता.