उद्या नाशिक येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळावा

  • दि.२२ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळावा

श्री. सतिष एस राठोड ✍

नाशिक:- कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालय नाशिक आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक आणि शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, सातपुर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी २०१९, शुक्रवार रोजी सकाळी ०९.३० ते सायं ३ वाजेपर्यंत शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, सातपुर, नाशिक येथे “ पंडीत दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी १५७३ रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध १८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

  • या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक जिल्हयातील ग्लॅक्सो स्मिथकेलाईन फार्मासिटिकल्स लि.अंबड, नाशिक (अॅप्रेंटिस, बी.फार्म-३ पदे), आर्ट रबर इंडस्ट्रिज लि. अंबड,नाशिक (एसएससी, फिटर १५ पदे), ईपीसी इंडस्ट्रीज लि अंबड,नाशिक (एस एस सी -५० पदे), महिद्रा अॅण्ड महिंद्रा लि.सातपुर एमआयडीसी नाशिक, (200 पदे, एस.एस.सी.-फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, पेंटर (जनरल)/डायमेकर प्रेस टुल्स /मोटार मेकॅनिक /शिटमेटल वर्कर /वायरमन /इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन /टर्नर /मशिनिस्ट (डेन्टिंग/ पेंटींग/ ॲन्ड वेल्डिंग), राईटर सेफ गार्ड प्रा. लि. ठाणे (ए टी एम ऑपरेटर(पुरुष)/ सि. आय. टी. बाईकर, एस एस सी- 20 पदे), डब्ल्यु एन एस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि. इंदिरानगर नाशिक ( असोसिएट किंवा सिनियर असोसिएट, पदवीधर बीए/बीकॉम/ बीएससी- २० पदे), श्री. रेणूकामाता मल्टी स्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी, अहमदनगर (ट्रेनी क्लार्क-२०, ट्रेनी कॅशियर-१०, शिपाई-१० एकुण-४० पदे), सी.टी.आर मॅन्युफॅक्चरींग इंडट्रिज अंबड नाशिक (फिटर-५ पदे, वेल्डर-१ पद, इलेक्ट्रिशियन-५ पदे, पेंटर-२ पदे, कारपेंटर-२ पदे, प्लंबर-१, एकुण १६ पदे), इंडोलाईन इंडस्ट्रिज प्रा.लि.अंबड, नाशिक (कारपेंटर-१५ पदे, पेंटर- १० पदे, एकुण-२५ पदे), डेटामॅटीक्स् ग्लोबल र्सव्हिसेस लि. मुंबई नाका, नाशिक (ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा-८०, पोस्ट ग्रॅज्युएट-८०, पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट-८०, एकुण-२४० पदे), युरेका फोर्ब्स लि. मुंबई नाका, नाशिक (सेल्स एक्झीक्युटिव्ह (एस एस सी) -५० पदे), क्लासपॅक लि. अंबड, नाशिक (ग्लास इंडस्ट्रि ऑपरेटर, एस एस सी आणि टर्नर-४ पदे), मुंगी इंजिनिअर्स प्रा.लि. अंबड, नाशिक (प्रेस ऑपरेटर आणि वेल्डर-१० पदे), डिजी डाटा सोल्युशन उंटवाडी, नाशिक. (एच एस सी आणि टायपिंग इंग्रजी-३०, १५ पदे, पदवीधर आणि टायपिंग इंग्रजी-३०, २० पदे, पदवीधर-२० पदे एकुण-५० पदे), बंडल टेक्नॉलॉजिस प्रा.लि. नाशिक (पदवीधर-२० पदे), धुमाळ पोल्ट्री इक्युपमेंट प्रा.लि. नाशिक (एस एस सी-१० पदे, एच एस सी आणि इलेक्ट्रिशियन-१० पदे , पदवीधर-३ पदे ,एकुण-२३ पदे), अॅपेक्स प्रिंटिंग टेक्नॉलॉजी प्रा.लि. नाशिक (बी.कॉम (आय टी)-१ पद, डिप्लोमा इन इंजिनियरिंग-१ पद एकुण-२ पदे), युवाशक्ती फाऊडेशन आश्वीननगर, नाशिक (नीम ट्रेनि एस एस सी / डाटाईन्ट्री ऑपरेटर-५०० पदे, नीम ट्रेनि डिप्लोमा इंजिनियरींग/ डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनियरींग-२०० पदे, ॲप्रेंटीस इलेक्ट्रिशियन/मॅकेनिकल/फिटर-१०० पदे, एकुण-८०० पदे), अशी एकूण १५७३ रिक्तपदे प्राप्त झाली आहेत. या मेळाव्यासाठी वरील १८ नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधार कार्ड,सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन Nashik Divisional Job Fair (2018-19) या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅप्लाय करावे. यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५३ –२९७२१२१ वर संपर्क करावा आणि या मेळाव्यास उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन सु.द.सैंदाणे, उपसंचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक विभाग, संपत चाटे, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर, नाशिक यांनी केले आहे.