इंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत

इंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत

संत श्री सेवादास महाराजांनी माये पासून दूर राहून ब्रम्हचारी राहण्याचा निश्चय आपल्या मनाशी केला होता काही झाले तरी लग्न करणार नाही असे सेवादास महाराजांनी ठरविले होते. मात्र जगदंबा देवीला सेवादास महाराज ब्रम्हचारी राहणे मान्य नव्हते. सेवादास महाराजांनी लग्न करावे असा एकसारखा अट्टहास देवीनी धरला होता. महाराज प्रत्येक वेळी लग्नाला नकार देत होते. शेवटी एके दिवशी तू लग्न का करीत नाही असा प्रखर प्रश्न देवीने विचारला. तेव्हा आपणास लग्नासाठी जोड नाही. जगातील संपूर्ण ​िस्त्रया जगदंबा देवीची रूप असल्याने लग्न कोणाबरोबर करावे असे सेवादास बोलले. इंद्रदेवाला व बृहस्पती देवाला भेटून न्याय मागण्याचे सेवादास महाराजांनी ठरविले. हे ऐकूण जगदंबा देवी खुश झाली व दोघे जण स्वर्ग लोकात गेले. स्वर्गलोकांत जाण्यापूर्वी सेवादास महाराजांनी बधुना बोलावून संागितले. मी जगदंबा देवीसोबत शरिर येथे ठेवून आत्मरूपाने स्वर्गात जात आहे. तेव्हा माझ्या शरिराचे रक्षण करा. माझ्या शरिराला नारींचा स्पर्श होवू देवू नका. नारिचा स्पर्श झाल्यास मी मरून जाईन असे सांगून योगक्रियेनी सेवादासांनी प्राण काढला व जगदंबा देवीसोबत स्वर्गात गेले. इंद्रदेवाच्या सभागृहात जगदंबा देवीसोबत स्वर्गात गेले. इंद्रदेवाच्या सभागृहात जगदंबा व सेवादास महाराज हजर झाले. इंद्रदेवानी स्वर्गात येण्याचे कारण विचारले. सेवादास महाराजांनी लग्नासबंधी न्याय मागीतला. तेव्हा इंद्रदेवानी सेवादास महाराज एक अवतारी पुरूष असून ब्रम्हचर्य त्यांच्या भाग्यात आहे,

त्यांना लग्नाचा जोडीदार नसल्याचे सांगितले . जगदंबा देवीचा साक्षात पाताळ लोकांत येण्यासाठी निघाले. जगदंबा देवीचा पराभव झाल्याने मृत्यू लोकात सेवादास महाराजाला पाठविण पसंत पडले नाही. देवीने दोन रूपे धारण केली. एक रूप सेवादास महाराज बरोबर होत तर दुस-या रूपानी सेवादास महाराजांनी आई धर्माळीमाता त्यंाना सेवादासचा मृत्यू झाल्याचे कळताच धर्मळी मातेला दुख अनावर झाले. धर्मळीमाता धावत येवून सेवादासाच्या शरिरावर पडल्या. सेवादास महाराज आत्मरूपानी स्वर्गात जात असतांना वापस येईपर्यत स्त्रीचा स्पर्श शरिराला होवू देवू नका असे आपल्या भावाला सांगून गेले होते. स्त्रीचा स्पर्श झाला तर मी वापस येणार नाही. असे सांगितले होते. धर्मळीमातेचा स्पर्श होताच सेवादास महाराजांचा मृत्यू शके सतराशे अठ्ठाविस शुध्द विनायक चतुर्थ पौष मास, 2 जाने 1773 रूई तलाव ता. दिग्रस जि.यवतमाळ येथे झाला. सेवादास महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या समाधीची जागा पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशीम या गावी मोठया चिंचेच्या झाडाखाली दाखविली होती. परंतू रूईच्या पाटलाला समाधीची डोली उचलल्या गेली नाही. पोहरादेवी येथील पाटलांनी महाराजांची डोली सहज उचलल्याने पोहरादेवी या गावाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्व प्राप्त होवून ऐतिहा​सिक रूप प्राप्त झाले.

पोहरादेवी यात्रा सेवादास महाराजांनी पोहरादेवी या गावी समाधी घेतली असल्याने या गावाकडे बघण्याचा बंजारा समाजाचा ष्टीकोन बदलून गेला. पोहरादेवी म्हणजे संत सेवादास महाराज साक्षात असल्याचे लोकांना वाटू लागले व याच कारणंानी वर्षाकाठी चार वेळेस या गावी यात्रा रु लागली. दिवाळीच्या पूव दिवस माडी पौणमेला , खुद दिवाळीच्या दिनी, दिवाळीच्या नंतर दिवसांनी व मार्च महिन्यात रामनवमीला, सेवादास महाराजांच्या जन्मदिनी यात्रा रु लागली. हळूहळू यात्रेचे महत्व वाढत गेले. यात्रेच्या माध्यमातून सेवादास महाराज कितीतरी भाविक क्तांना प्रस होवू लागले. प्रत्येक यात्रेला क्तगण नवस कबूल करुन नवसाची परत फड यात्रेला करु लागले. आज पोहरादेवीची यात्रा भारत भर गाजत आहे. पोहरादेवी या गावाचे नांव भारताच्या इतिहासात गाजत आहे. रामनवमीच्या यात्रेला कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर प्रांतातील बंजारा लोक तर लाखोच्या संख्येने यात्रेला येतात. परंतू इतर जाती जमातीतील लोक सुध्दा अक्षरश तुटून पडतांना दिसून येतात.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असे संताचे वचन आहे. संताचा जन्म मुळातच विवाच्या कल्याणासाठी मानवजातीच्या उध्दारासाठी असतो धर्म वेगळा असेन पंथ वेगळा असेन राज्य वेगळे असेन पण प्रत्येक संताने समाजाला माणुसकी हाच धर्म शिकवला.

अशाच एका थोर संतोच नाव आहे प.पू. डॉ. रामराव महाराज पोहरादेवी होय तीच पोहरादेवी मानोरा तालुक्यातील एक खेडवळ शहर वाशीम जिल्हयाच्या टोकावर वसलेले. यवतमाळ जिल्हयाच्या ​िसमेला लागून असलेले. एरव्ही ारताच्या ग्रामिण भागाची तेथील गावाची परिस्थीती जशी आहे तशी ​स्तिथी पोहरादेवीची पण पोहरादेवी हे फक्त खेळवळ गाव नाही तर ते अखिल ारतीय बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे रहिवाशी गांव आहे. बंजारा समाजाचे आदर्शगुरु संत सेवालाल महाराज यांची समाधी येथे आहे तर जागृत जगदंबेचे येथे व्य व पुरातन मंदिर आहे. प.पू. संत डॉ. रामराव महाराज यांच्याबाबत अनेक आख्यायिका त्यांचे क्त नित्याने सांगत असतात. आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामरावा हे महाराजांचे निस्सीम क्त होते. नांदेडचे स्व. शंकरराव चव्हाण हे ही होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजही त्यांना काही विशेष अडचण असल्यास यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. अनेक राजकिय नेत्याप्रमाणे अनेक नोकरशाहाही महाराजांचे निस्सीम क्त आहे. महाराजांचा क्त परिवार हा आसेतू हिमालय पसरला आहे. इकाँच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी जेव्हा बेल्लारी मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांचा प्रचार्थ संत रामराव महाराज बेल्लारीला गेले होते.

संत डॉ. रामराव महाराज यांचे राजकिय नेत्यांसोबत सलोख्याचे सबंध असले तरी त्यांनी उपेक्षीत बंजारा समाज यासाठी नेहमीच आपली ूमिका ठाम ठेवली आहे. बंजारा समाजाला संपूर्ण देशात व्ही.जे. एन.टी. हा प्रवर्ग मिळावा यासाठी प.पू. संत डॉ. रामराव महाराज यांनी विशेष प्रयत्न केले आहे व अद्यापही त्याबाबत त्यांचा लढा सुरु आहे. बंजारा समाज हा उपेक्षीत तर आहेच पण अशिक्षीतज व रुढीवादी आहे. बंजारा समाजाने शिकले पाहिजे. यासाठी समाजाच्या वेगवेगळया कार्यक्रमात आपल्या प्रवचनात ते नेहमीच सांगतात माता-पिता आणि गुरुच्या आज्ञेचे पालन करावे. या संसारात पिुरुषांनी नेकीने राहत घराला मंदिराचे स्वरुप द्यावे , गोपालन , ूमिसेवा लंबाडीबोल ाषा, वेशूषा यामध्ये कोणताही बदलाव त्यांनी करु नये , बालविवाह व हलाली खाउ नये , खाटकाला गाय विकू नये , व्यसनापासून नउ दिवस एक वेळेस जेवण करावे यादरम्यान मासाहार करु नये असेही डॉ. संत रामराव महाराज नेहमी सांगत असतात. डॉ. संत रामराव महाराज यांची उपेक्षीत समाजाप्रती असलेली निष्ठा त्यंानी त्यांच्या विचारात केलेले परिवर्तन बंजारा समजाला त्यंानी दिलेली दिशा , बंजारा समाजासाठी त्यंानी दिलेला लढा हया सर्व बाबी ध्यानात घेवून कर्नाटक मधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यंाना डि.लिट ने गौरवान्वीत करुन त्यांच्या कार्याला गौरवान्वीत केले. कर्नाटकचे महामहिम राज्यपाल यांनी ही मानद पदवी संत रामराव महाराज यांना दिली