इंदौर येथे बंजारा को-ऑप केडीट सोसायटीद्वारा कर्जाचे वितरण व सत्कार

2014-12-29_101753

इंदौर (प्रतिनिधी) – संपूर्ण भारतात बंजारा समाजात सुपरीचीत असलेले ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे मध्यप्रदेशचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक ज्यांना इंदौर मध्ये भाया म्हणून ओळखतात असे श्रावणसींग राठोड यांच्या गंगवाल बसस्टॅड समोरील भव्य अश्या हॉटेल जवलेरी पॅलेस वर त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या इंदोरशहर बंजारा बांधवाच्या सभेत भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे अमरावती विभागीय अध्यक्ष विलास राठोड, वाशिम जिल्हा अध्यक्ष खुशाल राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष श्याम राठोड, उपाध्यक्ष आकाराम चव्हाण व सरपंच सुनिल राठोड यांचे भव्य सत्कार करण्यात आले. सभेला इंदोरमधील उद्योगपती देविसिंग राठोड, प्रॉपर्टी डिलर कर्तारसिंग तेजावत, स्टेन क्रशरचे संचालक मोतीसिंग नायक स्क्रेप्टचे ठोक व्यापारी तेजसिंग मुछाल, ऍटोडिलचे संचालक राजू पवार, उत्तरप्रदेशचे उत्तरचे व्यापारी संजय राठोड, डॉ.कर्तारसिंग वडत्या, पलासिया पो.स्टे.चे पी.एस.आय.राजकुमार राठोड व अनेक लघुउद्योजक, कर्मचारी, समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. इंदौर शहर तथा परिसरातील बंजारा बांधवांच्या आर्थिक सोयीच्या हेतुने श्रावनसिंग राठोडच्या प्रेरणेने गरजवंत बंजारा बांधवांच्या उत्थानासाठी 2002 मध्ये बंजारा को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या कर्जदारांना चेकद्वारा कर्जाचे वितरण प्रमुख अतिथी विलास राठोड व त्यांच्या मित्रपरीरवारांच्या शुभहस्ते करण्यात आले. हि संस्था मागील 12 वर्षापासुन बंजारा बांधवांना अल्प व्याजदरावर कर्ज पुरवठा करीत आहे. विशेषतः शिक्षणासाठी, घर-प्लॉट खरेदीसाठी, दवाखाण्याच्या उचारासाठी, शेती घेण्यासाठी छोटय़ा उद्योगासाठी कर्ज पुरवठा करीत असते. पतसंस्थचे अध्यक्ष तोतारामजी जाधव उपाध्यक्ष ऋषी राठोड, सौ.मोहीनी राठोड, संचालक देविसींग राठोड, कर्तारसिंग तेजावत व सर्व संचालक मंडळ दर रविवारी एकत्र बसुन कामकाजाचा आढावा घेतात. या संस्थेचे जवळपास 550 सभासद असुन 300 सभासदांना 30 लाखाच्या जवळपास कर्जाचे वितरण केले आहे. जास्तीत जास्त सभासदांना सहभागी करूण संस्थेची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. अल्पस्या भागभांडवलावर सुरू झालेली पतसंस्था वटवृक्षासारखी झालेली आहे. इवलेसे रोपटे लावीले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी या म्हणी प्रमाणे या संस्थेचे स्वतःच्या मालकीचे कार्यालय व्हावे ह्या हेतूने त्यांचे प्रयत्न सुरू आहे.

Leave a Reply