आश्रमामधील बेघर व अनाथ मुलांसोबत अशोकभाऊ चव्हाण यांनी सहपरिवार वाढदिवस साजरा केला

कल्याण :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांचा दि.१’जून-२०१९(शनिवार) रोजी ३५’वा.वाढदिवस सोहळा अतिशय साध्या पद्धतीने ‘टिटवाळा,ता.कल्याण’ येथील ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन संचालित अनाथ,बेघर मुलांचे आश्रम’ याठिकाणी साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम मा.अशोकभाऊ चव्हाण यांनी सहपरीवार टिटवाळा येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक गणपती मंदिर येथील गणपतीचे दर्शन घृऊन पुढील आयुष्यासाठी आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी या आश्रमामध्ये जाऊन येथील लहान,चिमुरडी अनाथ व बेघर बालकांच्या सोबत आपला ३५’व्या वाढदिवसाचा केक या लहान चिमुरडी बालकांच्या हातून कापला व सर्वप्रथम या बालकाना त्यांनी आपल्या वाढदिवसाचा केक भरविला, यानंतर मा.अशोकभाऊ चव्हाण यांच्या परीवार तर्फे या सर्व बालकांना शेव चिवडा व वेफर्स चा फराळ वाटप करण्यात आला.

यानंतर हा वाढदिवस साजरा करताना मा.अशोकभाऊ चव्हाण यांचे मन व डोळे भारावून गेले होते आणि शेवटी त्यांनी सांगितले की,हा वाढदिवस मी,माझे वडिल-श्री.हिरामण चव्हाण,आई-सौ.लक्ष्मीबाई चव्हाण यांच्या आशिर्वादाने व राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ जाधव,मोठे बंधु तथा संस्थेचे उपाध्यक्ष तथा पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करीत आहे.तसेच,समाजातील सर्व समाजबांधवांनी आपला वाढदिवस अशाप्रकारे साजरा केला तर,याचा आनंद वेगळाच मिळतो आणि या आश्रमातील बालकांच्या मनामध्ये देखील नवचैतन्य निर्माण होते व आपण जणू आपल्या परीवारामध्ये असल्याचा आनंदाभास होतो.म्हणून मा.अशोकभाऊ चव्हाण यांनी यापुढे आपला दरवर्षी येणारा वाढदिवस हा आपण अशाचप्रकारे वेगवेगळ्या अनाथ आश्रमामधील लहान चिमुरडी बालकांच्या सहवासात करत जाऊ असे वचन घेतले.

यावेळी मा.अशोकभाऊ चव्हाण यांच्या सोबत त्यांच्या पत्नी-सौ.अनुसया चव्हाण,मुलगी-कु.पल्लवी,मुलगा-चि.हर्षद,तथा राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे प्रदेश सरचिटणीस-मा.सतिषभाऊ राठोड,आंबिवली शहराध्यक्ष-गोकुळ राठोड यांच्यासह अनाथ आश्रमामधील सर्व कर्मचारी,बंधु/भगिनी उपस्थित होते.