आश्रमशाळा पिंपरखेड ता.चाळीसगाव येथे दुमदुमला गोवर रूबेला लसीकरण जनजागृतीचा आवाज

डॉ. प्रमोद सोनवणे यांचे मार्गदर्शन

गोवर रूबेला लसीकरण विषयी डॉ. प्रमोद सोनवणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना

चाळीसगांव :- चाळीसगांव तालुक्यातील प्राथमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपरखेड येथे भारत सरकारच्या गोवर व रूबेला लसीकरण जनजागृती मोहिम राबविण्यात आली.

उपस्थित मान्यवर

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाज कल्याण सभापती मा.राजूभाऊ राठोड उपस्थित होते.

उपस्थित १८०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोटरी मिलेनियम अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे उपस्थित होते.

उपस्थित विद्यार्थ्यांना गोवर रूबेला विषयक सखोल मार्गदर्शन डाॅ प्रमोद सोनवणे यांनी केल्यानंतर प्रश्नमंजुषा घेऊन व दोन मिनिटे माहिती सांगनाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना रोटरी मिलेनियमच्यावतीने व मा.राजेंद्र राठोड यांच्या वतीने बक्षीसे देण्यात आलीत.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पातोंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रविण कोठावदे उपस्थित होते.

प्रसंगी प्राचार्य मा.उगले सर , मा.गुंजाळ सर, मा.बोरसे सर , मा.बी पी पाटील सर , आरोग्य सहाय्यक श्री सुनिल कायस्थ, आरोग्यसेवक श्री रूपेश पगार आदी मान्यवर उपस्थित होते.