“आरक्षण हे मुळी का मिळालं हे आपण लक्षात घेतल पाहिजे

आरक्षण हे मुळी का मिळालं हे आपण लक्षात घेतल पाहिजे. हजारो वर्षापासून आपल बहुजनांच शोषण करण्यात येत होतं, आपल्याला शिक्षण घेता येत नव्हतं सर्वबाजुनी आपली कुचंबणा होत होती. मनुवाद्यानी अशी व्यवस्थाच बनवून ठेवली होती.अशा या हजारो वर्षापासून अन्याय सहन करत असलेल्या समाजाला स्वतःच्या पायावर उभ करून मनुवादी प्रवृत्तीशी सामना करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती झाली. तस जर बघितलं तर आता जे खुल्या वर्गात मोडतात त्यांनी हेच आरक्षण हजारो वर्षे उपभोगल आहे असच म्हणाव लागेल म्हणून आरक्षण आपल्याला दिल म्हणजे फार मोठी मेहेरबानी केली अस कोणीही समजू नये.आणी हे आरक्षण सामाजिक आरक्षण आहे हे आपण चांगल्या प्रकारे समजवून घेतलं पाहिजे. सामाजिक आणी आर्थिक स्तरावरच आरक्षण यात आपणच मोठी गल्लत करत आहोत. आर्थिक आरक्षण म्हणजेच आजकाल सरकारने जे क्रिमीलेयर नावाच भूत सोडलं आहे ते, पुर्णपणे फसवेगिरी आहे ती. बाबासाहेबांच्या घटनेमध्येही या स्वरूपाच आरक्षणबद्दल ब्र शब्दही नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेकाच्या वेळी पण ब्राम्हणी व्यवस्थेमुळे मनस्ताप सहन करावा लागला. का त्यांची आर्थिक परिस्थिती डळमळीत होती. तर नाही ते आर्थिक दृष्ट्या समृद्ध होते तरीही सामाजिक पत या ब्राम्हणानी शुन्य केली.तो तर राजा होता त्यांनाही या व्यवस्थेने खाली दाखवण सोडलं नाही तर सर्व सामान्यांच काय?? अशीच गोष्ट शाहू महाराजांची अशी अनेक उदाहरण देता येतील जिथे आर्थिक बाजू सक्षम असूनही या ना त्याप्रकारे बहुजनांच शोषण करण्यात आलेलं आहे म्हणूनच मला वाटतं आपण आरक्षण समजवून घेताना हे लक्षात घेतल पाहिजे की आपल्याला मिळालेल आरक्षणाचा पाया हा सामाजिक परिस्थिती वर अवलंबुन आहे आर्थिक स्तरावर नाही.
आता कुठे आपल्याला 45-50 वर्षे होतात आहे आरक्षण मिळून आणी आताच आपल्यात खेचाखेची सुरु झाली. आरक्षण तोकड पडतय हे खर आहे आपली लोकसंख्या वाढते आहे, शिक्षणाच प्रमाण वाढल आहे आणी पुढे हे वाढतच जाणार मग सर्व जण फक्त 3 % अवलंबून राहिले तर सुशिक्षित बेरोजगार वाढतील याचा विचार आपण सर्व समाज बांधवानी केला पाहिजे.
ज्ञानसिंग जाधव साहेबांनी दिलेली सुचना खरोखरंच योग्य आहे. व्यावसायिक शिक्षण घेऊन आपण आपल्या पुर्वजांसारखा उद्योग धंद्यात दबदबा निर्माण केला पाहिजे.
रमेश पवार साहेबांनी मांडलेली कैफीयत तितकीच खरी आहे. समाजातील काही वर्गच आरक्षणाचा फायदा घेताना दिसतो आहे आणी शेतकरी व शेतमजूर यांच्यापर्यंत हा फायदा पोहचत नाही.
क्रिमीलेयर हा उपाय आरक्षण तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी असू शकत नाही. क्रिमीलेयरची अट मंजूर करून आपण आयतच कोलीत सरकारच्या हाती दिलेलं आहे.
आपणच आपल्या समाज बांधवाना मदत करू शकतो कींवा अशी व्यवस्था निर्माण करू शकतो जेणेकरून आरक्षण तळागाळापर्यंत पोहचेल.  आपण शिक्षणासाठी आणी नोकरीसाठी असे दोनवेळा आरक्षणाचा फायदा घेतो. आपण जर आपल्या घरातील दोन पिढीना आरक्षणाचा फायदा घेऊ दिला तरी बर्यापैकी प्रगती होऊ शकते म्हणूनच तिसर्यावेळी सुज्ञ माणसांनी आरक्षणाचा फायदा न घेता दुसऱ्याला हास्तांतरीत करावा. असा निश्चय सर्व नागरिकांनी केला तर मला खात्री आहे नक्कीच आरक्षण तळागाळापर्यंत पोहचेल.
विमान विमानतळावरील धावपट्टीवर 1-2 फेर्या मारते आणी नंतर उड्डाण करते. आरक्षण ही धावपट्टी आहे उंच उडण्यासाठी. आपल विमान फक्त धावपट्टीवरच धावत आहे उंच उड्डाण करीत नाही परिणामी दुसरी विमान धावपट्टीवर धावू शकत नाही.

श्री कैलास चव्हाण (पालतीया)

~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.goarbanjara.com

image

Leave a Reply