आमदार-नरेंद्र पवार यांच्याकडे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची निवेदनाद्वारे मागणी.

“संत सेवालाल महाराज व देवी जगदंबा माता मंदिर” साठी जागा व बांधकामासाठी आमदार निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी निवेदन

बंजारा लाईव्ह, श्री. सतिष एस राठोड

कल्याण :- आंबिवली (पूर्व) ता.कल्याण येथे बंजारा समाज गेल्या २५-३० वर्षापासून वास्तव्यास असून या समाजाचे ‘आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी जगदंबा मातेचे मंदिर’ गेल्या २०-२५ वर्षापासून मोहने पोलिस चौकीच्या बाजूला मोकळ्या जागेवर स्थापन आहे. या मंदिरामधे दररोज हा समाज सकाळ-संध्याकाळ पुजा-अर्चना करीत असतो.मात्र गेल्या काही वर्षापासून या समाजाकडून “मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक श्री.रहेजा” हे त्या मंदिरावरील जागेवर ताबा मागत असुन ते या समाजाला वेळोवेळी आपल्या काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पाठवून या समाजातील लोकांना धमकी देत असतात, ही जागा आमच्या ताब्यात द्या नाहीतर तुमच्यावर पोलिस कारवाई करु आणि तुम्हाला ईथून पळवून लावु.

  • येथील समाजबांधवांनी हि माहिती “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कथन केली आणि लगेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ चव्हाण, मुंबई विभागीय सचिव-सुरेश पवार,कल्याण तालुकाध्यक्ष-अशोकभाऊ राठोड, तालुका सचिव-केवलसिंग तंवर,मोहने शहराध्यक्ष-राम राठोड,अटाळी-आंबिवली शहराध्यक्ष-गोकुळ राठोड,समाजसेवक-विठ्ठलभाऊ राठोड, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “कल्याण पश्चिम चे कार्यसम्राट आमदार नरेंद्रजी पवारसाहेब यांना भेटून सदर घटनेची माहिती देऊन “निवेदन” सादर केले असुन यावेळी,आमदार-नरेंद्रजी पवार यांनी राष्ट्रीय बंजारा टायगर्स च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले की ‘संत सेवालाल महाराज व जगदंबा देवी’ या दैवतांना मी देखील मानत असुन,या मंदिराला जागा उपलब्ध करुन देण्याचे माझे आद्य कर्तव्य आहे.नुसती जागा च नाही तर, या मंदिरांच्या बांधकामासाठी “आमदार निधीतून हे मंदिर बांधण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले .यावेळी आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांना आश्वासन दिल्याने त्यांचे आभार मानले व प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,आणि ईतर मान्यवर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply