“आदर्श बंधुप्रेम”

मित्र हो जय सेवालाल..👏
माझ्या जिवनाचा पहिला दिवस म्हणजे 1 जुलै. हा दिवस माझ्यासाठी खुप महत्वाचा दिवस आहे. कारण त्याच दिवसी म्हणजे 1 जुलै रोजी बंजारा समाजाचे महानायक व अधुनिक महाराष्ट्राचे सिल्पकार मा.मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांचा पण जन्म दिवस आहे. मित्र हो मी किती भाग्यवान आहे. यांचा मला खुप खुप अभिमान वाटतें कारण वसंतरावजी नाईक साहेब यांचा  बंजारा समाजा मध्येच जन्म 1 जुलै 1913 रोजी झाला होता अणि ….1 जुलै 1977 रोजी माझा जन्म झाल मी पण त्याच समाजाच पोर आहे. मला माझ्या समाजाचा अभिमान आहे अन् राहणार पण. वसंतरावाना एक आदर्श म्हणुन त्यांचे कार्य ध्यानात घेऊन समाजाच्या प्रत्येक बाधंवाना समाजाच्या गोर गरीबांना जास्तीत जास्त शिक्षणाला महत्व देण्यासाठी मी सदैव प्रोत्साहन करीत आहे. कारण शिक्षणा शिवाय समाजाचे अस्तित्व घडत नसतो. त्या करीता निस्वार्थी भावनेतून विना राजकारण मी गोर बंजारा संघर्ष समिती भारत यांचे संयोजक श्री रविराजजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंजारा समाजाच्या एकतेला चांगले स्वरूप देऊ असे ठरविले अाणि गोर गरीबांच्या घरो घरी जाऊन त्यांच्या समश्या जानुन घेत आहे.देशाला जोडण्यासाठी खुप वेळ लागणार आहे पण त्या कामाला खुप उत्साहाने आमचे सर्व स्वयंसेवक पदाधिकारी करीत आहे.वसंतरावजी नाईक म्हणजे लहान मोठ्यांच्या हृद्धया मध्ये राहणारा नाव.हा लोकनेता,महानायक, बंजारा समाजाला देवाने दिलेली देणगी, ईश्वराने संत सेवालाल महाराज नंतर समाजातील लोकनेता म्हणजे वसंतरावजी नाईक.समाजाच्या एवढ्या महान माणसाच्या वाढदिवाला आपला जन्म झाला म्हणजे खुप महत्वाची गोष्ट .
समाजाच्या त्या महान नेत्याला मी साष्टांग दंडवत करतो. व समाजातील सर्व बांधवाना एकच सांगु ईच्छितो कि सर्व देशातील बंजारा समाज ज्या दिवशी एकञ होईल त्या दिवशी एक बंजारा राष्ट्र निर्माण होऊ शकेल. कारण बंजारा समाजाची लोकसंख्या खुप मोठी आहे.त्या करीता आपण सर्व बंजारा समाजांच्या सर्व होतकरू समाज शेतकरी बाधंव,अधिकारी वर्ग व विद्यार्थ्यांना एकच सांगु इच्छितो कि तन,मन,धनाने समाज बाधंणीसाठी निस्वार्थपणे समोर यावे व समाजाला..एकतेच्या गाटीमध्ये बांधावे.
महानायकाच्या जयंती निमित्त
आपणास हार्दिक शुभेच्छा…!!
महानायकांला विनम्र अभिवादन..💐👏
धन्यवाद…👏
सौजन्य :-गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत, संस्थापक/अध्यक्ष, जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे महा.व सेवादास वाचनालय सावरगांव (बंगला) ता.पुसद जि.यवतमाळ 445209
मो.9819973477

image