अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार यांची निवड: विषेष प्रतिनिधि गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र,

“अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार यांची निवड”

विशेष प्रतिनिधी : “विदर्भाचा युथ आयकॉन” म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेले विदर्भातील प्रसिद्ध चित्रपट गीतकार तथा परिवर्तनवादी साहित्यिक एकनाथ पवार,नागपूर यांची साहित्य क्षेत्रातील नामांकित व सर्वत्र नेटवर्क पसरलेल्या अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली

पवाराच्या निवडीने विदर्भाच्या साहित्य व सांस्कृतिक वारसाला एक नवी ऊभारी लाभणारी आहे. प्रगल्भ आणि वास्तवदर्शी लिखाण.जे ह्रद्याला भिडुन ह्रद्याला मानवी कल्याणाचं आणि स्फुलिंग चेतवणारा रक्त पुरवठा करणारे त्यांचं लेखन वैशिष्टय.यासह न्यायवंचितासाठी “लेखणी आणि लढा” या दोन्ही रणभूमीवर समर्पक न्याय देणारा एक तडफदार युवा नेतृत्व म्हणून विदर्भात त्यांच्याकडे बघितल्या जाते.

मराठी साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रातील एक अग्रगणी संस्था असून साहित्य आणि नवोदित प्रज्ञा-प्रतिभाना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक दर्जेदार अधिष्ठान होय. प्रख्यात साहित्यिक व प्रकाशक शरद गोरे,पुणे हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असून दशरथ यादव हे सरचिटणीस आहेत.

अ.भा.मराठी साहित्य परिषदे सारख्या नामांकित संस्थेची  महत्वाची जबाबदारी सोपवल्याची माहिती विदर्भाध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी दिली.

न्यायवंचित,श्रमिक,उपेक्षित, बहुजन यासह सर्व घटका पर्यंत एकनाथ पवार या निवडीने मजल गाठु शकेल आणि नवोदितांना एक आपलसं व्यक्तिमत्व म्हणून वाटणार्या पवाराचं आज सर्वत्र कौतुक होत आहे.

“तांडाकार ते वेदनाकार ”  हा आधुनिक बंजारा साहित्य-संस्कृतीचा एक गतिमान वारसा म्हणून नामोल्लेखित होतो.पवार सुद्धा तांडा वस्तीमधून उगवलेले एक प्रखर व्यक्तिमत्व.आपल्या कर्तृत्वाने परिघाबाहेर जाऊन तांड्याला ,आणि संपूर्ण न्यायवंचिताला न्याय आणि सन्मान बहाल करण्याचं कार्य करीत आहे,   तर प्रख्यात विचारवंत यशवंत मनोहराच्या शब्दात सांगायचे झाल्यास,”तांड्याच्या वेदनाची लिपी “तांडाकार” आत्माराम राठोड यांनी महाराष्ट्राला  प्रथमच उलगडून दाखविली.”

तांडाकारानी आपली साहित्यप्रतिभा तांडाबाहेर अधोरेखित केली.नेमकं याच परिवर्तन लिपीला शब्दबद्ध अभिव्यक्तीमध्ये रूपांतर करुन समग्र न्यायवंचिता पर्यंत मानवमूक्तीसाठी मजकुर पेरण्याचं विचारकृती पवार करीत आहे.ही बहुजनासह बंजारा समाजासाठी गौरवाची बाब म्हणावी लागेल.त्यांचा “तांडेसामू चालो” ही लोकोत्तर संकल्पना खूप काही सांगणारी आहे.

तांडाकार यांना देखिल गोरमाटी साहित्त्योत्तर क्षेत्रात मजल गाठता आली.अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे २४ वे नवोदित मराठी साहित्य संमेलन दि.२१/२२मे२०१७रोजी वणी जि.यवतमाल येथे आयोजित केलेले असून ऐड.पुरुषोत्तम खेडेकर यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  साहित्य परिषद आयोजित यापूर्वीच्या नवोदित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवीवर्य नारायण सूर्वे,शिवाजी सावंत,रा रं बोराडे,केशव मेश्राम,विठ्ठल वाघ,आ.ह,सालुंखे,इंद्रजित भालेराव आदी प्रतिभावंत व्यक्तीमत्वानी भूषवलेले आहे. अशा नामांकित  साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर एकनाथ पवाराची निवड ही समाजासाठी व विदर्भासाठी एक प्रशंसनीय बाब मानावी लागेल.

सौजन्य:गोर कैलास डी राठोड

गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

 

Tag: Banjara Live News, Gorbanjara, lamani, jai sevalal

Leave a Reply