अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमीपूजनाचा मुहुर्त ठरला

image

अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या अतिभव्य शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहिर्त ठरला आहे.   १९ फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीला याचे भूमीपूजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. काँग्रेसने तयार केलेला आराखडा अती सुंदर असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.   तसेच इंदू मिलबाबत केंद्राकडे हमीपत्र सुपूर्द करण्यात आले आहे. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांचं भव्य स्मारक बनवणार असल्याची हमी सुद्धा त्यांनी दिली.   शिवस्मारकाच्या मार्गातील ज्या काही अडचणी असतील त्या तातडीनं दूर करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी विधानसभेत बोलताना दिलं. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची भेट घेऊन पर्यावरण खात्याची मंजुरी मिळवली होती. त्यामुळं स्मारकाच्या मार्गातला एक मोठा अडथळा यापूर्वीच दूर झाला आहे.