अपंग सौ. छाया मनोहर चव्हाण, हीने कुडाच्या घरात राहणे पसंद केले, पण शौचालय बांधले

पुसद (प्रतिनिधी) : रामनगर मोहा येथील अपंग महिला सौ. छाया मनोहर चव्हाण हीने पं.स. सदस्या आशा चव्हाण यांनी ‘शौचालय बांधा घरोघरी’ ही मोहिम राबवून दारोदारी भेट दिली होती. त्यामुळे प्रोत्साहित होवून सौ. छाया चव्हाण या अपंग महिलेने आपल्या पतीला आपण कुडाच्या घरात राहू पण शौचालय चांगले बांधू यासाठी तयार केले आणि शौचालयाचा खड्डा खोदण्यास मनोहर पतीने सुरु केले. परंतू अतिखडकाळ जमिन असल्याने खड्डा खोदल्या जात नव्हता. तरीही मनोहर आणि छाया यांनी मनोबल खचू दिले नाही. कसे बसे दोन फूट खोदकाम होवू शकले म्हणून जमिनीच्या वर टाके बांधकाम करु पण शौचालय बांधूच असा निर्धार केला आणि जमिनीच्यावर शौचालयाचे टाके बांधले. जोडीला एक नाहणीपण बांधून घेतली. या सर्व खटाटोपीत खर्च वाढतच गेले, पण निर्धार मात्र पक्का होता. मनोहरकडे केवळ दिड एकर शेती आहे.

मोल मजुरी करणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा त्याचा नित्य कर्म आहे. त्यातून जे जमा ठेवीले ते आपलं छोटसं घरटं बांधण्यासाठी होते. परंतू पत्नी अपंग, पावसाळा आणि इतरही ऋतूत तिला शौचाला बाहेर जाण्यासाठी होणारी अडचण याची खंत पती पत्नीच्या मनात होतीच, ‘तेव्हाच कोणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणावं लागतं’ या म्हणीप्रमाणे पं.स. सदस्या आशा चव्हाण आणि त्यांचे पती प्रा. संजय चव्हाण यांनी स्वतःच्या गावासाठी काहीतरी करु, ही खुनगाठ मनाशी बांधून अधिकारी वर्ग आणि ग्राम पंचायतला सोबत घेवून शासनाच्या योजनेचा लाभ घ्याव यासाठी ‘शौचालय बांधा घरोघरी’ यासाठी दारोदारी भेट देत फेरी काढली आणि छाया आणि मनोहरला आधार भेटला. त्यांनी घर कुडाचे राहू दिले. पण शासनाकडून मिळणार्या दहा हजाराची मदत घेवून त्यात घरासाठी राखून ठेवलेली पुंजी टाकून चाळीस हजाराचे शौचालय बांधले. तीस गावकर्यांनी प्रोत्साहनाला प्रतिसाद देवून शौचालय बांधल्यामुळे त्यांच्याघरी जावून त्यांचा सत्कार करण्याचे आशा चव्हाण आणि प्रा. संजय चव्हाण यांनी ठरविले. सौ. छाया चव्हाण हिच्याही घरी जावून शाल व गुलाब पुष्प देवून तिला सन्मानित करण्यात आले. तेही त्यांनी बांधलेल्या सुव्यवस्थीत शौचालयासमोर बाजूलाच त्यांचे कुडाचे घर हे सर्व पाहून जणूकाही आनंदच व्यक्त करीत होते, परंतु या आनंदात सहभागी होण्यासाठी मनोहर मात्र गैरहजर होता. कारण दुष्काळाचे सावट असल्याने गावात काम नाही म्हणून मनोहर सकाळी 8 वाजताच शहराकडे कामाच्या शोधात गेला होता. या प्रसंगी उपस्थित अधिकारी वर्ग एका त्रीने दुसर्या त्रीस प्रोत्साहन दिल्यास अशक्य ते शक्य होवू शकते आणि पतीने पत्नीला साथ दिली तर घरच काय गावही स्वच्छ होवू शकते असे गौरवोद्गार काढित होते. आता प्रश्न आहे अशा प्रोत्साहित करणार्या दांपत्य आणि प्रोत्साहनाला दाद देवून गरिबी आणि अपंगात्वर मात करुन शौचालय बांधणार्या दांपत्याकडून समाज प्रेरणा घेईल काय? शासन याची दखल घेईल काय?

Leave a Reply