अनावश्यक खर्चाला फाटा देवून सारखरपुडय़ातच झाले शुभमंगल

परळी (प्रतिनिधी) : अनावश्यक खर्चाला फाटा देत साखरपुडय़ातच लग्न सोहळा आयोजित करुन राठोड व चव्हाण परिवाराने आदर्श घालून दिला आहे. परळी तालुक्यातील मांडेखेल येथील रहिवाशी भीसराम राठोड यांच्या कन्या चि.सौ.कां. किरण राठोड व उदगीर तालुक्यातील डोंगरगावचे रहिवाशी नारायण चव्हाण यांचे चि. रमेश चव्हाण यांचा साखरपुडा 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.28 वा. आयोजिला होता. दोन्ही परिवारातील नाते वाइककदुन सारखपुडय़ातच शुभविवाह करण्याचा प्रस्ताव पुढे आला. दोन्ही परिवारांनी एक मुखाने पाठिंबा देत सारखरपुडय़ातच शुभविवाह करण्यास संमती दिली व उपस्थितांनीही या निर्णयाचे स्वागत केले व चि.सौ.कां. किरण व चि. रमेश विवाहबद्ध झाले. त्यांना उपस्थितांनी शुभेच्छा देवून कौतूक केले. वधु-वरांना शुभआशिर्वाद देण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ. जी.एल. पवार, ग्रामीण रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीहरी नागरगोजे, परळी शहराचे पो.नि. धरमसिंग चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ, संजय खाकरे, डॉ. रुक्मीणी पवार, डॉ. विश्वजित पवार, प्रा. चव्हाण, रावसाहेब राठोड, मधुकर राठोड, रामराव आडे, बाळासाहेब जाधव, पाटील, डॉ. सरवदे, उत्तम राठोड, मारोती चव्हाण गुरुजी, मनोज एसके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. साखरपुडय़ात शुभविवाह केल्याने राठोड व चव्हाण परिवाराचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply