अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने बंजारा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

बंजारा लाईव्ह, श्री. सतिष एस राठोड

ठाणे:- रविवार दि.२ रोजी अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने बंजारा रत्न पुरस्कार सोहळा ठाणे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. कांतीलाल नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. करसन राठोड हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतीचे पूजन करण्यात आले.

  • बंजारा समाजात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या समाजातील काही निवडक व्यक्तींना बंजारा रत्न पुरस्कार व बंजारा समाजातील पत्रकार यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकारी आणि विद्यार्थी यांचा गौरव देखील करण्यात आला.
  • तसेच आलेल्या मान्यवरांनी समाज बांधवांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय बंजारा सेनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply