अखिल भारतीय बंजारा कवी व गायक संघाचे अध्यक्ष बंजारा समाजातील थोर समाज प्रबोधनकार

अखिल भारतीय बंजारा कवी व गायक संघाचे अध्यक्ष बंजारा समाजातील थोर समाज प्रबोधनकार बंजारा भूषण ,दलित मित्र ह.भ.प.प्रेमदासजी महाराज यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी अल्पसा आजाराने दुःखद निधन झाले. बंजारा समाजातील तळागाळातील लोकांना व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा आदी विषयांवर दिवस रात्र एक करून समाज प्रबोधनातून महाराजांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम संपूर्ण आयुष्यभर केले.अशा महान कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला समाज कधीही विसरू शकत नाही आज त्यांच्या निधनाने बंजारासह सर्वच समाजामध्ये हळहळ व्यक्त होत.काल दि 26 अगस्ट 2020 ला रात्री 8 वाजता त्यांच्या राहत्यागावी वनोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पावन समूर्तीला विनम्र श्रद्धांजली.

Leave a Reply