अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क महासमिती*

[19/12, 11:44 p.m.] Nilesh Prabhu Rathod: *दि.26 डिसेंबर,2017* दु.12.वा

*अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क महासमिती*
——————————————–

प्रति,
मा.तहसीलदार,
————————————‘—————————–

*विषय* : *गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगयाणा राज्यातील हिंसाचारग्रस्तांना संरक्षण प्रदान करण्याबाबत…*

महोदय,
ऊपरोक्त विषयी सविनय नमुद करण्यात येते की,भारतातील संपुर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात वास्तव्यास असणारा गोरबंजारा हा समाज साधारणपणे 44 वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात आहे.
12 कोटीच्या जवळपास लोकसंख्या असणारी ही जमात प्रांतरचना करताना, सामाजिक आरक्षण देतांना तसेच संवैधानिक  मानवाधिकार प्रदान करताना वंचीत राहिली. एक समूह, एक भाषा, एक भूषा व एक संस्कृती असणारी ही जमात वेगवेगळ्या राज्यात विखुरला जाऊन वेगवेगळ्या नावाने विभीन्न  प्रवर्गात टाकण्यात आली. आजही हा समूह केवळ धाटी, वाणी व बानो ( वहिवाट, भाषा व पेहराव), तांडा पंचायत व स्वतंत्र वसाहत असलेला आणि प्राचीन प्रणालीनुसार जीवन जगत आहे. आज मात्र हा समूह आपल्या स्वतंत्र अस्तितवासाठी संघर्ष करतो आहे.अशातच तेलंगणा ह्या राज्यात त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नये म्हणून आकसापोटी व षडयंत्र रचून गोंड व ईतर आदिवासी जमातींकडून हिंसाचार झाला त्यामुळे गोरबंजारा या समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करण्यासह संपुर्ण राज्यात संरक्षण प्रदान करून तेलंगणा राज्यातील गोरबंजारा/लंबाडा समाजावरील हिंसाचार घडवणार्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती आहे.

आपले विश्वासू,

( माहिती व योग्य कार्यवाहिस्त्व सादर )
1)मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
2)मा.विभागीय आयुक्त…
3)मा.जिल्हाधिकारी….
[19/12, 11:58 p.m.] Prof Phulsing Jadhav: *तेलंगणा राज्यातील गोरबंजारा/लंबाडा या समाजावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी नागपूर येथे बंजारा समाज बांधवांची तातडीची बैठक संपन्न*
–——————————————-
नागपूर : तेलंगणा राज्यात आदिलाबाद येथे दि.15 डिसेंबर रोजी गोंड व कोया ह्या आदिवासी जमातींकडून बंजारा/लंबाडा समाजावर अनुसूचित जमातीच्या आरक्षणावरून आकसापोटी हल्ला करण्यात. त्यावर तेलंगाणा बंजारा बांधवांना धैर्य व साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय मान्यवरांसमवेत सर्व सामाजिक संघटनांची बैठक ना.संजय राठोड,महसूल राज्यमंत्री यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत माजी मंत्री,मनोहर नाईक,माजी खासदार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, आमदार प्रदिप नाईक, आमदार डाॅ.तुषार राठोड,राजू नाईक राष्ट्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया बंजारा सेवा संघ , डॉ टी सी राठोड, संदेश चव्हाण आदिसह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्राधान्यक्रमानुसार सर्वप्रथम मंत्री,आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधींसह हिवाळी अधिवेशनातच मुख्यमंत्री यांना निवेदन देणे,राज्यातील सर्वच तालुक्यात व जिल्हात दि.26 डिसेंबर 2017 रोजी एकाच दिवशी दुपारी 12 वाजता अनुक्रमे तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणे व राज्यातील मंत्री,आमदार,संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी व शेजारच्या राज्यातील प्रमुख प्रतिनिधींसमवेत दि.2 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथे बैठक घेऊन दिल्ली येथे जन आंदोलन करण्याची तयारी करण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले.बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे प्रमुख पदाधिकारींची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply